जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड बाजार समितीचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष जायभाय यांच्या गटाचा तेलंगशीत दारूण पराभव झाला. तेलंगशीत 20 वर्षांनंतर सत्तांतर झाले. तरूणांनी एकत्रित येत प्रस्थापिताविरोधात आवाज उठवत निवडणुकीचे मैदान गाजवले जनतेने तरूणांच्या एकजुटीला साथ देत एकहाती सत्ता सोपवली. तेलंगशीत सत्ताधारी भाजपचा राष्ट्रवादीने धुव्वा उडवत सर्व नऊ जागांवर विजय मिळवला.