खर्ड्यात सत्तांतर; राष्ट्रवादीने दिला भाजपला जोरदार धक्का (Independence in Kharda; The NCP gave a strong push to the BJP)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा ग्रामपंचायतमध्ये भाजपाला धोबीपछाड देत राष्ट्रवादीने खर्ड्यावर झेंडा फडकवला.भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपाच्या हातून ही ग्रामपंचायत निसटली. आमदार रोहित पवार व माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी येथील ग्रामपंचायती निवडणुकीकडे स्वत:हून लक्ष घातले होते. आमदार रोहित पवारांच्या विकासाच्या व्हिजनला जनतेने साथ दिली. विजयसिंह गोलेकर यांच्या नेतृत्वाखालील खर्डा ग्रामविकास आघाडीने खर्डा ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे. (Independence in Kharda; The NCP gave a strong push to the BJP)
खर्डा ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 तर भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 17 सदस्यांसाठी मतदान पार पडले होते. या 17 पैकी 11 जागा राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायतीने जिंकल्या आहेत. गत ग्रामपंचायतीत येथे भाजपाचे नेते माजी मंत्री राम शिंदेंच्या गटाचे वर्चस्व होते. मात्र, यंदा रोहित पवारांनी आपला करिश्मा दाखवून खर्डा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवालाय. निकालानंतर राष्ट्रवादी समर्थकांनी गावात जल्लोष केलाय.