Ranbhaji mahotsav: स्वातंत्र्यदिनी जामखेडमध्ये पार पडला रानभाजी महोत्सव

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ranbhaji mahotsav: दरवर्षी प्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनी कृषि विभाग व आत्मा यांच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जामखेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाला (Ranbhaji mahotsav) राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी भेट दिली. यावेळी शिंदे यांनी रानभाज्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली. कृषि विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

Jamkhed Agriculture Department Organized by ranbhaji mahotsav held in Jamkhed on Independence Day,

दरवर्षी कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जाते. जामखेड कृषि विभागाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या परिसरात रानभाजी महोत्सवाचे आज आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी 32 रानभाज्यांचे स्टाॅल लावण्यात आले होते.नैसर्गिक रानभाज्यांची ओळख आणि त्या भाज्या शिजवण्याची पध्दत या महोत्सवात दाखवण्यात आली. त्याचबरोबर रानभाज्यांच्या औषधी गुणधर्माविषयी उपस्थितांना तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर व त्यांच्या टीमने मार्गदर्शन केले.

जामखेड तालुका कृषि विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाला माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी या महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका सविस्तर सांगितली.

Jamkhed Agriculture Department Organized by ranbhaji mahotsav held in Jamkhed on Independence Day,

कृषि विभागाने आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सवाला प्रांताधिकारी सायली सोळंके, तहसीलदार योगेश चंद्रे, गट विकास अधिकारी प्रकाश पोळ, नगरपरिषद मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरिक्षक महेश पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, पंचायत समिती सदस्य डाॅ भगवान मुरुमकर,  तालुकाध्यक्ष अजय काशिद, अशोक देवकर, सह आदींनी भेट दिली. याशिवाय तालुक्यातील माजी सैनिक, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी, युवकांनी या महोत्सवाचा आनंद लुटला.

रानभाजी महोत्सव यशस्वी होण्यासाठी जामखेड कृषि विभाग व आत्माच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.