(Jamkhed Corona updates) | जामखेडकरांनो सावधान ; मंगळवारी कोरोनाने दिलाय मोठा दणका
आठवडाभरापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंतेत भर टाकणारी
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेडकरांनो बेफिकीरपणा सोडण्याची वेळ आता आली आहे. तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर येऊ लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंतेत भर टाकणारी ठरू लागली आहे. (Jamkhed Corona updates)
कोरोनाच्या दुसर्या लाटेने तालुक्याची उडवलेली दाणादाण अजुनही ताजी आहे. कोरोना थंडावला थंडावला असे चित्र असतानाच आता तो पुन्हा सक्रीय होऊ लागलाय तो अधिक विध्वंसक होऊ नये याकरिता सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. मंगळवारी कोरोनाने मोठा दणका दिला आहे. दिवसभरात 30 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. (Jamkhed Corona updates)
जामखेड तालुका आरोग्य विभागाने आज दिवसभरात तब्बल ५५६ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या. तर ४५४ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. (Jamkhed Corona updates)
आज दिवसभरात करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये जामखेड ०३, तेलंगशी ०१, भुतवडा ०१, वाघा ०१, कुसडगाव ०१ असे ०७ तर जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या RTPCR कोरोना तपासणी अहवालात जामखेड ०४, तेलंगशी ०७, नाहुली०२, बोरला ०२, धनेगाव ०१, महारुळी०१, मतेवाडी ०१, वंजारवाडी ०२, साकत ०१, बावी ०१,फक्राबाद ०१ असे एकुण २३ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार दिवसभरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० झाली आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली. (Jamkhed Corona updates)