Jamkhed Corona updates : आता मात्र कहरच झाला ; कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला
एकाच दिवसांतील सर्वोच्च रूग्णसंख्या कोरोनाने शुक्रवारी नोंदवली
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील जनतेच्या चिंता वाढणारी ही बातमी आहे. जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे.कोरोनाची तिसरी लाट सक्रीय होण्याआधीच रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी शासन प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. बैठकांचा फार्स रोजच होत आहे. नियम ठरवून दिले खरे पण ते नेमके कुणासाठी ? गोरगरिबांच्या मुळावर नियम उठले आहेत. बडे लोक सर्रास नियमांना पायदळी तुडवत आहेत. शहरासह तालुक्यात हीच परिस्थिती आहे. (Jamkhed Corona updates -highest-patients-on-friday)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोना गेला. तो समुळ नष्ट झाला या अविर्भात सध्या जनतेचे दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. जामखेड तालुक्याला कोरोनाने गेल्या काही दिवसांतील सर्वात मोठा दणका शुक्रवारी दिला आहे. एकाच दिवसांतील सर्वोच्च रूग्णसंख्या कोरोनाने शुक्रवारी नोंदवल्याने जामखेड तालुक्यात कोरोना पुन्हा महाविध्वंस घडवण्याच्या तयारीत असल्याचे आता दिसू लागले आहे.शुक्रवारी जामखेड तालुक्यात तब्बल ८७ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. (Jamkhed Corona updates -highest-patients-on-friday)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुका आरोग्य विभागाने शुक्रवारी दिवसभरात ६०४ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या यामध्ये जामखेड ०५, वाघा ०२, राजुरी ०१, भुतवडा ०३, धोतरी ०३, घोडेगाव ०२ असे १६ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या RTPCR कोरोना तपासणी अहवालात जामखेड २०, तेलंगशी २८, दौंडवाडी ०१, बांधखडक ०१, भुतवडा ०१, बोरला ०४, डिसलेवाडी ०१, हापटेवाडी ०१, जमदारवाडी ०२, खर्डा ०१, कुसडगाव ०१, महारूळी ०१, साकत ०१, शिऊर ०३, सोनेगाव ०१, सावरगाव ०१, पिंपरखेड ०२, रत्नापुर ०१ असे एकुण ७१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. (Jamkhed Corona updates -highest-patients-on-friday)
शुक्रवार दिवसभरात एकुण ८७ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. ही संख्या एकाच दिवसांतील सर्वात मोठी रूग्ण संख्या आहे. दरम्यान आरोग्य विभागाने आज दिवसभरात एकुण ४५७ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी जामखेड टाईम्सशी बोलताना दिली. (Jamkhed Corona updates -highest-patients-on-friday)