जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील राजुरी गावचे पोलीस पाटील दत्तात्रय मोरे यांना कर्जत उपविभागमधून आदर्श पाटील पुरस्कार घोषित करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण प्रांत अधिकारी नितीन पाटील याच्या हस्ते आज करण्यात आले.
गावातील महसूल व पोलीस प्रशासनाच्या जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळणे, जातीय सलोखा, उत्सव, गावातील तंटे गावातच मिटवणे सह आदी प्रभावी कामे पार पाडल्यामुळे मोरे यांना आदर्श पाटील या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
पोलीस पाटील दत्तात्रय मोरे यांना कर्जत उपविभागमधून आदर्श पाटील पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल जामखेडचे तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार भोसेकर, इंगळे ,काळे, पोलीस निरीक्षक महेश पाटील,जामखेड तालुका पोलीस पाटील संघटना अध्यक्ष योगीनाथ जायभाय पाटील, महादेव वराट, अमोल गायकवाड, निलेश वाघ, भोरे सह आदींनी अभिनंदन केले .