जामखेड : हळगाव येथे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे आयोजन, प्रा सुकुमार कांबळे यांचे होणार व्याख्यान !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त जामखेड तालुक्यातील हळगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा हा जयंती सोहळा शनिवार दि 26 ऑगस्ट 2023 रोजी पार पडणार आहे. जयंती महोत्सवाच्या या कार्यक्रमासाठी जामखेड तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन जयंती सोहळ्याचे स्वागताध्यक्ष अरूण मंडलिक व एबीएस ग्रुपचे अध्यक्ष शरद मंडलिक यांनी केले आहे.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त जामखेड तालुक्यातील हळगाव येथे भव्य दिव्य जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे हा जयंती सोहळा येत्या 26 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. भव्य मिरवणुकीने या सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे. सायंकाळी 4 वाजता ही मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व्याख्याते प्रा सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम भैरवनाथ विद्यालयाच्या मैदानात होणार आहे.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे आयोजन जामखेड तालुक्यातील हळगाव येथील ABS ग्रुपने केले आहे. 26 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जयंती महोत्सवासाठी हळगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन अध्यक्ष- शरद मच्छिंद्र मंडलिक , उपाध्यक्ष – दादा संजय मंडलिक, सचिव- पांडुरंग बारिकराव खंडागळे, संपर्क प्रमुख- विकास लक्ष्मन मंडलिक शरद सहदेव मंडलिक, रामदास बाळू कांबळे सह संयोजन समितीने केले आहे.