जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे कार्यालय स्थलांतरीत !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यामुळे रुग्णालयाचे बांधकाम सुरु आहे. सदर कामामुळे जामखेड ग्रामीण रुग्णालय (कोविड हॉस्पिटल) येथील ग्रामीण रुग्णालयाचे कार्यालय जुन्या पंचायत समिती येथे स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे यांनी आज 5 रोजी दिली.

Jamkhed Rural Hospital office shifted to old Panchayat Samiti,

जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सध्या सुरु आहे. सद्यस्थितीतील चालू असलेले बांधकामास गती प्राप्त झाल्यामुळे तूर्तास ग्रामीण रुग्णालयातील कार्यालयीन कामकाजासाठीचे कार्यालय हे जुन्या पंचायत समिती आवारात स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र रुग्णसेवा व रुग्णांशी संबंधित इतर सेवा ग्रामीण रुग्णालय (कोविड हॉस्पिटल) येथे सुरू राहणार आहेत.

स्थलांतरीत झालेल्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे कार्यालय व विवाह नोंदणी हे देखील या कार्यालयात सुरू ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन स्थलांतरित असलेल्या ठिकाणी कार्यालयीन कामकाजासाठी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे यांनी केले आहे.