जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्याच्या राजकारणातील सर्वात महत्वपूर्ण असलेल्या जवळा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या पत्नी सौ. शितल प्रशांत शिंदे यांनी विरोधी गटाच्या उमेदवाराला पराभवाची धुळ चारीत दणदणीत विजय संपादन केला. जवळा ग्रामपंचायतवर युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. सरपंचपदी सुशील आव्हाड तर उपसरपंचपदी शितल प्रशांत शिंदे हे आता विराजमान झाले आहेत.
जवळा ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुक नुकतीच पार पडली होती. या निवडणुकीत युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जवळा ग्रामविकास पॅनलने शेतकरी ग्रामविकास आघाडीचा दारूण पराभव करत ग्रामपंचायतवर एकहाती सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत सरपंचपदासह सदस्यपदाच्या 10 जागा जिंकून जवळा ग्रामविकास पॅनलने विजयी गुलाल उधळला होता.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जवळा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या पत्नी शितल प्रशांत शिंदे विरूध्द प्रदिप दळवी असा सामना झाला. या निवडणुकीत शितल शिंदे ह्यांना 11 तर प्रदिप दळवी यांना 5 मते मिळाली. या निवडणुकीत शितल शिंदे ह्या 6 मतांनी विजयी झाल्या. शितल शिंदे यांच्या दिमाखदार विजयानंतर जवळा ग्रामविकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.
यावेळी सरपंच सुशिल सुभाष आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य शितल प्रशांत शिंदे, सोनाली राहूल पाटील, रफिकभाई शेख, राधिका मारूती हजारे, भाऊसाहेब महारनवर, मंगल आव्हाड, नंदा कल्याण आव्हाड, हरिदास हजारे, सारिका रोडे, जयश्री कोल्हे, प्रदिप दळवी, प्रशांत पाटील, पांडुरंग शिंदे, किसन सरोदे, सिताबाई पठाडे हे सर्व सदस्य उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी बबन बहीर तर निरीक्षक म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी कैलास खैरे यांनी काम पाहिले.
जवळा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शितल प्रशांत शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर जवळा ग्रामविकास पॅनल व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी जवळा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख मुरली अण्णा हजारे, काकासाहेब वाळुंजकर, दशरथ कोल्हे, सोमनाथ वाळुंजकर, तुकाराम भाऊसाहेब हजारे, प्रमोद कोल्हे, प्रविण मेहेर, महादेव हजारे ,अमोल रोडे, एकनाथ हजारे, अनंता लेकुरवाळे, दीपक देवमाने, युवा नेते अमोल हजारे, ज्येष्ठ नेते बाळू चेअरमन पाटील, सुरेश भाऊसाहेब लेकुरवाळे, राहुल पाटील, सावता हजारे, पांडुरंग रोडे, डॉ ईश्वर हजारे, तानाजी पवार, राहुल मासोळे, अनिल माने, नाना कोल्हे, राष्ट्रपाल आव्हाड, गणेश बोराटे, रमेश नाना पाटील, अंकल कोल्हे, बाबासाहेब आव्हाड, जाफर शेख, सचिन विटकर, दादा पाटील, राहुल हजारे, गणेश बोराटे, अजित लेकुरवाळे, जीवन रोडे, वैभव हजारे सह आदी उपस्थित होते.