Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडून विद्यार्थ्यांना मिळाली अनोखी भेट, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते शालेय साहित्यांचे वितरण !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : स्वातंत्र्य दिनानिम्मित देशभरात विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. देशभर देशभक्तीचा उत्साह आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना अनोखी भेट देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत.जामखेड तालुक्यातील कवडगाव प्राथमिक शाळेमध्ये असाच एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राधिकाताई नाना आढाव यांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांची अनोखी भेट देण्यात आली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.
जामखेड तालुक्यातील कवडगाव येथील राधिकाताई नाना आढाव या नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्या कवडगाव प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आहेत. यंदा संपुर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राधिकाताई आढावा यांनी शालेय विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुढाकार घेतला. यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिम्मित राधिकाताई आढावा यांनी कवडगाव प्राथमिक शाळेतील 40 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पॅड व इतर शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी, 14 ऑगस्ट रोजी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते कवडगाव प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. हाती शालेय साहित्य पडताच विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसांडून वाहत होता. सर्व विद्यार्थी यावेळी आनंदून गेले होते. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राधिकाताई आढाव यांनी घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी भरभरून कौतुक केले.
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमासाठी जामखेड बाजार समितीचे सभापती पै शरद दादा कार्ले, राजुरी सोसायटीचे चेअरमन हरिदास उगलमुगले, कवडगावचे सरपंच सिताराम कांबळे, जेष्ठ नेते तथा कवडगावचे माजी सरपंच सखाराम भोरे, सेवा सोसायटीचे चेअरमन अंकुश राऊत, उपसरपंच लक्ष्मण गटाप, नारायण भोरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश खोसे, महादेव राऊत मेजर, माजी सरपंच नाना आढाव, शहादेव बोधे, माजी उपसरपंच बाळासाहेब भोरे,
तंटामुक्तीचे अध्यक्ष युवराज भोरे, राहुल भोरे, हरिचंद्र भोईटे, राम वाघमारे, शत्रुघ्न राऊत, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, ओम कोकाटे, आतिक भाई, बाळासाहेब हंगे महाराज,दादा परहार, सागर बोधे, अंबादास राऊत, परमेश्वर राऊत, आजिनाथ भोईटे, गणेश गोपाळघरे, बंटी चोरखले, आजिनाथ भाऊ लोखंडे, संजू बापू भोरे, सिद्धार्थ आढाव, दादा आढाव, अशोक भोईटे, अंगद भोरे, सह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच सखाराम भोरे यांनी प्रास्ताविक केले तर शाळेचे शिक्षक बबन यादव यांनी आभार मानले.