Onion Subsidy : कांदा अनुदानासाठी त्रिसदस्यीय समितीचा पाहणी अहवाल जामखेड बाजार समितीस सादर करा – सभापती शरद कार्ले यांचे शेतकऱ्यांना अवाहन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कांदा अनुदान मिळण्याकरिता अर्ज सादर केलेल्या जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी 7/12 उताऱ्यावरील पिक पेरा व शासकीय अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी अहवाल तात्काळ जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सादर करावा, असे अवाहन जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी केले आहे.
माहे 01 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च मार्च 2023 या दोन महिन्याच्या कालावधीमधील कांदा अनुदान मिळावे यासाठी जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीकडे अर्ज सादर केले होते. सदरचे अनुदान प्राप्त होण्यासाठी 7/12 उताऱ्यावरील पिक पेरा व शासकीय अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी अहवाल आवश्यक आहे.
त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी 7/12 उताऱ्यावरील पिक पेऱ्याची नोंद तलाठी ग्रामसेवक व कृषि सहाय्यक या त्रिसदस्यीय समितीचा पाहणी अहवाल बाजार समितीस तात्काळ सादर करावे, असे अवाहन जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी केले आहे.