‘ज्योती क्रांती’ | jyoti kranti च्या जामखेड शाखेचे १८ व्या वर्षांत पदार्पण !

jyoti kranti multistate Jamkhed branch debuts in 17 years!

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : राज्यात अर्थिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जामखेड तालुक्यातील जवळा येथील ज्योती क्रांती कॉ - ऑप क्रेडिट सोसायटीच्या (jyoti kranti multistate branch) जामखेड शाखेचा १७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ज्योती क्रांतीने (jyoti kranti multistate Jamkhed branch) राज्यात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेला आहे. राज्यातील ग्राहकांचा विश्वास संपादन करत आर्थिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी ज्योती क्रांतीचे मोठे योगदान राहिले आहे. जामखेड शहरात १७ वर्षापुर्वी ज्योती क्रांतीने पाऊल ठेवले होते. १७ वर्षाच्या प्रवासात या संस्थेने शेकडो बेरोजगारांना व्यवसायिक कर्जाच्या माध्यमांतून रोजगारभिमुख बनवण्याचे काम केले आहे. आज ही संस्था जामखेडकरांच्या मनामनात व घराघरात विश्वासाचे प्रतिक ठरली आहे. ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बँकेला वटवृक्ष बनवण्यासाठी घेतलेली आपार मेहनत सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचे प्रतिक बनली आहे.

 

ज्योती क्रांती
जामखेड शहरातील ज्योती क्रांतीचे १८ वर्षांत पदार्पण !

रविवारी ज्योती क्रांतीच्या जामखेड शाखेचा (jyoti kranti multistate Jamkhed branch) १७ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. प्रशांत गायकवाड प्रशांत, संजय सासवडकर, जगदीश मेनकुदले, राजेंद्र परदेशी, साजिद बागवान, रमेश बांगर, संदीपान हजारे, ईश्वर मुरूमकर, सुभाष गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, शाम मुरूमकर,संदिप बेलेकर, दिपक कांबळे,अरविंद हजारे, दत्तात्रय उबाळे, संजय जावळे, महेश निमोणकर, निलेश उंबरे, बालाजी केवडे,कपिल राऊत,सचिन रासकर सह आदी उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे (Ajinath Hazare, Chairman of Jyoti Kranti), व्हा.चेअरमन दशरथ हजारे आणि मा.संचालक मंडळाचे उपस्थितांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. ज्योती क्रांतीचे व्यवस्थापक किरण वर्पे {Kiran Warpe, the manager of Jyoti Kranti) यांनी उपस्थित मान्यवर अतिथी, खातेदार, हितचिंतकांचे आभार मानले. याप्रसंगी ज्योती क्रांतीचे (jyoti kranti multistate Jamkhed branch) दै. ठेव प्रतिनिधी, बचतगट प्रेरक, तालुका विकासक आणि कर्मचारी उपस्थित होते.