जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच सुभाष (तात्या) काळदाते यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ रविवार दि 11 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे.
राजुरी ग्रामपंचायत निवडणुक 10 जागांसाठी होत आहे. या ठिकाणी जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. तर 9 जागांवर सदस्यपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास पॅनलकडून माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते यांच्या सौभाग्यवती वैशालीताई सुभाष काळदाते ह्या सरपंचपदासाठी उमेदवार या आहेत.
उद्या रविवारी 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा नारळ वाढवला जाणार आहे. जनसेवा ग्रामविकास पॅनल जंगी शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.उद्या होणाऱ्या प्रचार शुभारंभासाठी राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी, बांगरमळा, घुलेवस्ती येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन पॅनल प्रमुख सुभाष (तात्या) काळदाते यांनी केले आहे.
माजी सरपंच सुभाष (तात्या) काळदाते यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा ग्रामविकास पॅनलचे उमेदवार आणि त्यांचे चिन्ह खालील प्रमाणे
सरपंचपदाच्या उमेदवार : वैशालीताई सुभाष काळदाते
वार्ड क्रमांक 1चे उमेदवार खालील प्रमाणे
1) विशाल अशोक चव्हाण – ट्रॅक्टर
2) संगिता बाळू मोरे – रोड रोलर
3) वैशाली सुधीर सदाफुले – रिक्षा
वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार खालील प्रमाणे
1) सुरेश आश्रूबा खाडे – रिक्षा
2) विजूबाई भास्कर घुले – ट्रॅक्टर
3) कुसुमताई रामदास खाडे – कटई
वार्ड क्रमांक- 3 चे उमेदवार खालील प्रमाणे
गौतम आश्राजी फुंदे – रोड रोलर
संगीता शिवदास कोल्हे – ट्रॅक्टर
सुरज सुनिल गायकवाड – रिक्षा