माजी सरपंच सुभाष (तात्या) काळदाते यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा ग्रामविकास पॅनल राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात, वाचा प्रभागनिहाय उमेदवारांची यादी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड तालुक्यात तीन ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी आता रंगात आली आहे. चिन्ह वाटप झाल्याने प्रचाराच्या तोफा धडाडण्यास सुरुवात होणार आहे. राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या जामखेड तालुक्यातील राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच सुभाष (तात्या) काळदाते यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा ग्रामविकास पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
राजुरी ग्रामपंचायत निवडणुक 10 जागांसाठी होत आहे. या ठिकाणी जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. तर 9 जागांवर सदस्यपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास पॅनलकडून माजी सरपंच सुभाष (तात्या) काळदाते यांच्या सौभाग्यवती वैशालीताई सुभाष काळदाते ह्या सरपंचपदासाठी उमेदवार असणार आहेत. माजी सरपंच सुभाष (तात्या) काळदाते हे सर्व समाज घटकाला सोबत घेऊन चालणारे अतिशय संयमी आणि मनमिळावू असे अनुभवी आणि अभ्यासू राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यांच्या पॅनलला तरूणांसह गावातील सर्व नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा वाढू लागला आहे.
राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजुरी, डोळेवाडी, घुलेवस्ती, एकबुर्जी, बांगर मळा येथील मतदार आहेत. या निवडणुकीत 2100 च्या आसपास मतदान आहे. राजुरीत माजी सरपंच सुभाष (तात्या) काळदाते यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा ग्रामविकास पॅनलने दहा तगडे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहेत. जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या तगड्या उमेदवारांमुळे विरोधी गट धास्तावला आहे.
माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा ग्रामविकास पॅनलने उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार जंगी शक्तिप्रदर्शन केले होते. यामुळे विरोधकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. आता प्रत्यक्ष प्रचाराच्या रणधुमाळीत जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या प्रचारापुढे विरोधी गटाचा कितीपत टिकाव लागणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
माजी सरपंच सुभाष (तात्या) काळदाते यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा ग्रामविकास पॅनलचे उमेदवार आणि त्यांचे चिन्ह खालील प्रमाणे
सरपंच पदाच्या उमेदवार : वैशालीताई सुभाष काळदाते
वार्ड क्रमांक 1चे उमेदवार खालील प्रमाणे
1) विशाल अशोक चव्हाण – ट्रॅक्टर
2) संगिता बाळू मोरे – रोड रोलर
3) वैशाली सुधीर सदाफुले – रिक्षा
वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार खालील प्रमाणे
1) सुरेश आश्रूबा खाडे – रिक्षा
2) विजूबाई भास्कर घुले – ट्रॅक्टर
3) कुसुमताई रामदास खाडे – कटई
वार्ड क्रमांक- 3 चे उमेदवार खालील प्रमाणे
गौतम आश्राजी फुंदे – रोड रोलर
संगीता शिवदास कोल्हे – ट्रॅक्टर
सुरज सुनिल गायकवाड – रिक्षा