जामखेड, दि 07 एप्रिल, जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । लोकनेते स्व.श्रीरंगराव कोल्हे आणि लोकनेते स्व. प्रदीप (आबा) पाटील यांच्या कौटुंबिक वारसदारांनी जवळा सोसायटीच्या निवडणुकीत एकत्रित येत शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमांतून निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे.
जवळा सोसायटीच्या राजकारणात लोकनेते स्व. श्रीरंगराव कोल्हे आणि लोकनेते स्व प्रदीप (आबा) पाटील यांच्या गटाचे नेहमी वर्चस्व राहिले आहे. मागील वर्षी कोल्हे आणि पाटील या दोन्ही नेत्यांच्या निधनामुळे यंदा होणार्या सोसायटीच्या निवडणुकीत काय होणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर दोन्ही दिवंगत नेत्यांच्या कुटूंबातील वारसदारांनी यंदाच्या निवडणुकीत एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे.
स्व. श्रीरंगराव कोल्हे यांचे सुपुत्र दत्तात्रय कोल्हे साहेब व स्व. प्रदिप (आबा) पाटील यांचे बंधू माजी उपसभापती दीपक नानासाहेब वाळुंजकर पाटील यांनी सोसायटी आपल्या ताब्यात रहावी यासाठी कंबर कसली आहे.जवळा सोसायटीच्या निवडणुकीत कोल्हे व पाटील यांनी एकत्रित येत शेतकरी विकास आघाडी स्थापन केली असून या निवडणुकीत 13 तगडे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहेत.
लोकनेते स्व.श्रीरंगराव कोल्हे आणि लोकनेते स्व प्रदीप (आबा) पाटील यांच्या पश्चात यंदा प्रथमच सोसायटीची निवडणूक होत आहे.कोल्हे आणि पाटील यांचा सर्व समाज घटकांना न्याय देणारा राजकीय विचार जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही कुटूंबातील वारसदारांनी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जवळा सोसायटीच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
दरम्यान जवळा सोसायटीच्या निवडणुकीत लोकनेते स्व श्रीरंगराव कोल्हे आणि लोकनेते स्व प्रदीप आबा पाटील यांच्या आशीर्वादाने आम्ही शेतकरी विकास आघाडी स्थापन केली आहे. त्यानुसार आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत, आमच्या नेत्यांचे फोटो कुठल्याही फलकावर, बॅनरवर वापरण्याचा कुणालाही नैतिक अधिकार नाही, विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग सुरू आहेत, जनता विरोधकांना योग्य तो धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया शेतकरी विकास आघाडीचे नेते तथा माजी उपसभापती दीपक पाटील आणि दत्तात्रय कोल्हे यांनी दिली.
दिपक पाटील व दत्तात्रय कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास आघाडी मंडळ निवडणूक लढवित असून या मंडळाला माजी सरपंच शहाजी वाळुंजकर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ.महादेव पवार, आर. डी. पवार, चेअरमन आजीनाथ हजारे यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.
शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार खालील प्रमाणे