जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यात चर्चेत असलेल्या जवळा सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल रविवारी सायंकाळी समोर आला असून या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीने शेतकरी ग्रामविकास आघाडीला पराभवाची धुळ चारत दिमाखदार विजय मिळवला आणि सोसायटीवर आपली सत्ता कायम राखली.
जवळा सोसायटी निवडणूकीच्या निकालाकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर सत्ताधारी गटाला पुन्हा सत्ता राखण्यात मोठे यश आले.सभासदांनी नाकारल्याने सोसायटीवर कब्जा मिळवण्याचे शेतकरी ग्रामविकास पॅनलचे स्वप्न धुळीस मिळाले. शेतकरी ग्रामविकास पॅनलला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत एकुण 31 उमेदवार रिंगणात होते, त्यातील शेतकरी विकास आघाडीचे सर्वच्या सर्व 13 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या पॅनलचा 200 च्या लीडने दणदणीत विजय झाला.
विजयानंतर शेतकरी विकास आघाडीच्या नेत्यांनी आणि समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी अन् गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. शेतकरी विकास आघाडीचा विजय जाहीर होताच आघाडीच्या वतीने गावातून जंगी विजयी रॅली काढत विजयोत्सव साजरा केला.
शेतकरी विकास आघाडीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे
1.नवनाथ पोपट बारस्कर – 799
2. राजेंद्र रामचंद्र हजारे – 817
3. अविनाश काकासाहेब लेकुरवाळे – 767
4. काशिनाथ गहिनीनाथ मते – 799
5. चंद्रहार किसन पागिरे – 803
6. अरूण नामदेव रोडे – 804
7. कैलास महादेव वाळुंजकर – 788
8. शहाजी संभाजी पाटील (वाळुंजकर) 790
9. आयोध्या रामलिंग हजारे – 826
10. सायरा सत्तार शेख- 828
11. शिवाजी तुकाराम कोल्हे – 846
12. मच्छिंद्र मारूती सुळ – 833
13. रूपचंद तुकाराम अव्हाड – 846
शेतकरी ग्रामविकास पॅनलचे पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे
1. अमोल शंकर हजारे – 592
2. पुरूषोत्तम मारूती कोल्हे – 595
3. संजय बाजीराव लेकुरवाळे 597
4. नवनाथ मुरलीधर मते – 561
5. नारायण शिवाजी पागिरे – 587
6. मोहन गणपत रोडे – 572
7. अंगद नामदेव वाळुंजकर – 576
8. प्रभाकर हौसराव वाळुंजकर – 600
9. भारती सुरेश रोडे – 661
10. सुमन भानुदास रोडे – 644
11. विष्णू बाबूराव हजारे – 593
12. सुशिल सुभाष अव्हाड – 639
13. कुंडलिक विनायक गाढवे – 624