अतिवृष्टीमुळे नुकसान : जामखेड तालुक्यात कृषी व महसुलकडूून संयुक्त पंचनामे सुरु, पहा फोटोतून नुकसानग्रस्त भागाचा आढावा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे खरिप पिके वाया गेली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेकांची रानं चिबडून गेली आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी सरकारकडून पंचनामे हाती घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
आज 19 रोजी पासून जामखेड तालुक्यातील 83 गावांमधील नुकसानग्रस्त भागात महसुल आणि कृषी विभागाकडून संयुक्त पंचनामे हाती घेण्यात आले आहेत अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली. ज्या भागात 33% नुकसान झाले आहे अश्याच भागात पंचनामे केले जाणार आहेत.
नुकसानीचे पंचनामे करण्याबरोबर पीक पाहणीची नोंद केली जात आहे. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांचे पथक गावोगावी पंचनामे करताना दिसत आहेत. पंचनाम्यापासुन एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जामखेड तालुक्यातील 83 गावांमध्ये सुरु असलेल्या पंचनाम्याच्या मोहिमेत दुपारपर्यंत महसूल व कृषी विभागाच्या पथकाने भेटी दिलेल्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा पाहूयात खालील छायाचित्रातून !