Karjat Jamkhed News : राजेवाडीत खेला होबे, राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या युवा कार्यकर्त्यांची ४८ तासांत घरवापसी, आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपात प्रवेश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपमध्ये स्वयंस्फुर्ती लोक दाखल होत आहेत. तर दुसरीकडे वेगवेगळे आमिषे देऊन दमबाजी व दडपशाहीचा वापर करून राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणले जात आहेत. या घडामोडींना वेग आलेला असतानाच आता राष्ट्रवादीला हादरा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी अवघ्या ४८ तासांत भाजपात घरवापसी केली आहे. या राजकीय भूकंपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रोहित पवारांच्या मनमानी कारभाराविरोधात मतदारसंघातील गावागावात मोठी नाराजी उफाळून आली आहे. ही लाट थोपवण्यासाठी रोहित पवारांच्या यंत्रणेकडून अनेकांचा आमिषे दाखवून पक्षप्रवेश घडवून आणला जात आहे. परंतू त्यांचा हा डाव त्यांच्यावरच बुमरँग होताना दिसत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात भूमिपुत्रांचा लढा व्यापक झाल्यामुळे गावोगावचे अनेक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात दाखल होत आहेत. याशिवाय ज्या कार्यकर्त्यांचा भूलथापा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला जात आहे तेही कार्यकर्ते अवघ्या काही तासांत राष्ट्रवादीची साथ सोडून पुन्हा भाजपात घरवापसी करताना दिसत आहेत. एकुणच घडणाऱ्या या घडामोडी पाहता मतदारसंघात भूमिपुत्राचा लढा व्यापक झाल्याचेच दिसू लागले आहे.
जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील भाजपचे सहशक्तीकेंद्र प्रमुख पै नामदेव कुमटकर व त्यांच्या सहकाऱ्यांना रोहित पवारांच्या उपस्थितीत दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतू या प्रवेशाला ४८ तास उलटत नाही तोच, युवा नेते पै नामदेव कुमटकर यांनी पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. पै नामदेव कुमटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी आमदार प्रा राम शिंदे यांची भेट घेऊन पुन्हा भाजपात प्रवेश केला. कुमटकर यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी अर्थात रोहित पवारांना जोरदार हादरा बसला.
राजेवाडीचे युवा नेते पै नामदेव कुमटकर यांच्यासमवेत समाधान कुमटकर, सुनील कुमटकर, लक्ष्मण कुमटकर, संभाजी निंबाळकर, नारायण गोरे, विकास सेंडकर, बाबासाहेब शेंडकर, बाळू शिंदे, भरत कुमटकर, लक्ष्मण शिकारे, रामा भोसले, योगेश गोरे, सुरज गोरे, विष्णू कुमटकर, राम गोरे, किसन निंबाळकर, बाबू गोरे, अतुल कूमटकर, दादा गोरे,निलेश कुमटकर, गजेंद्र ढेपे, भाऊसाहेब कूमटकर,दत्ता निंबाळकर, बंडु कुमटकर, प्रल्हाद शेंडकर गजेंद्र ढेपे या कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांची आज चोंडी येथे भेट घेतली.
गैरसमजातून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र आमची चुक आमच्या लक्षात आली असून आम्ही पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून या सर्वांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला.आमदार प्रा राम शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपा नेते सचिन पोटरे,बापुराव ढवळे, पांडुरंग उबाळे, पै दत्ता शिंदे, विष्णू गंभीरे, राहूल चोरगे, दिनेश शिंदे, सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.