Karjat Jamkhed News : मुस्लिम बांधवांचं ठरलं.. आपला भाऊ आपला रामभाऊ ! पिंपरखेडमधील मुस्लिम बांधवांचा भाजपात प्रवेश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराची रणधुमाळी सुरु होण्याआधीच मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीसाठी मुस्लिम समाजानेही आता आपली निर्णायक भूमिका ठरवली आहे. यंदा भूमिपुत्राला साथ द्यायची असा पक्का निश्चय करत जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील मुस्लिम बांधवांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला. मुस्लिम बांधवांच्या या निर्णयामुळे जामखेड तालुक्याच्या राजकारणात मोठा धमाका झाला आहे.
मुस्लिम बांधवांचा नेहमी वोटबँक म्हणून वापर करणाऱ्या राष्ट्रवादीला यंदा कर्जत जामखेडमध्ये यंदा मोठा धक्का बसताना दिसत आहे. कर्जत-जामखेडच्या स्वाभिमानासाठी आणि आभिमानासाठी भूमिपुत्रांनी पुकारलेल्या निर्णायक लढ्यास मुस्लिम बांधवांनी बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पहिली सुरुवात जामखेड तालुक्यातील पिंपरखेड या गावातून झाली आहे. पिंपरखेड येथील मुस्लिम बांधवांनी आपला भाऊ..आपला रामभाऊ असे म्हणत थेट भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी मतदारसंघातील सर्वसामान्य जनता ‘जात-धर्म-पंथ’ विसरून मोठ्या ताकदीने एकवटू लागल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होऊ लागले आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरखेड येथील माजी चेअरमन मकबुल शेख, माजी संचालक सिराजभाई शेख, ग्रामपंचायत सदस्य इसाकभाई सय्यद, जेष्ठ नेते बादशाह सय्यद, इमाम शेख, इनुस बेग, रिजवान पठाण, जमीर शेख, अमीन शेख, समीर पठाण, जमीर पठाण, जंजीर पठाण, रज्जाक शेख, असलम शेख, राजू शेख, जिशान सय्यद, वसीम खान, मज्जू खान, अजीम खान, या मुस्लिम बांधवांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी सरपंच राजेंद्र ओमासे, शिवाजी कारंडे, दत्तात्रय अधुरे, अल्पसंख्याक सरचिटणीस रियाज शेख, महादेव क्षीरसागर, दादा क्षीरसागर सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक गावांमधील सर्वसामान्य जनता व प्रभावशाली कार्यकर्ते स्वयंस्फूर्तपणे आमदार प्रा राम शिंदे यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. आमदार रोहित पवारांविरोधात मतदारसंघात जोरदार लाट निर्माण झाल्याचेच चित्र आहे.