Karjat Jamkhed News : कर्जत तालुक्यात राजकीय भूकंप, शिंपोरा (नवे आणि जूने) येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठीशी भूमिपुत्र एकवटले
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ऐन दिवाळीत कर्जत तालुक्यातील अनेक गावांमधील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रोहित पवारांची साथ सोडत भाजपात प्रवेश घेण्याचा धडाका लावला आहे. भाऊबिजेच्या दिवशी कर्जत तालुक्यातील शिंपोरा (नवे आणि जूने) या गावात मोठा राजकीय भूकंप झाला. येथील राष्ट्रवादीच्या जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. या राजकीय भूकंपाने राष्ट्रवादीला जोरदार हादरा बसला आहे.
कर्जत तालुक्यातील शिंपोरा (नवे आणि जूने) येथील सोसायटीचे माजी संचालक बाळासाहेब काळे, कुंडलिक काळे, संतोष काळे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे तालुका सरचिटणीस आदम अब्दुल शेख, शहाबुद्दीन शेख, अनिरुद्ध पाटोळे, बापू जाधव, विलास काळे, ह भ प विलास महाराज काळे, योगेश काळे, चंद्रकांत जाधव, मयूर जाधव, सुमित जाधव, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर जाधव, स्वप्निल जाधव, शहाजी जाधव या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह रोहित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. भाऊबिजेच्या दिवशी या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चोंडी येथे रविवारी सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला. या राजकीय भूकंपाने कर्जत तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
कर्जत-जामखेडच्या स्वाभिमानासाठी व अभिमानासाठी भूमिपुत्रांनी पुकारलेल्या निर्णायक लढ्याला बळ देण्यासाठी शिंपोरा येथील (नवे आणि जूने) स्वाभिमानी कार्यकर्ते एकवटले असून या कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठीशी आपली सर्व ताकद उभी करण्याचा निर्णय घेत भाजपात प्रवेश केला.शिंपोरा – बाभळगाव – मानेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये झालेल्या राजकीय भूकंपाने रोहित पवारांना जोरदार धक्का दिला आहे.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते पोपट (आबा) मोरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा देशमुखवाडीचे माजी सरपंच सुरेश ऊर्फ बंडाभाऊ मोढळे, विजय पोटरे, माजी सरपंच बिभीषण गायकवाड,माजी सरपंच मोहन काळे, ग्रामपंचायत सदस्य रामदास जाधव, माजी उपसरपंच जालिंदर काळे,सुभाष काळे, विक्रम काळे, एल.जी. जाधव, माजी उपसरपंच तथा सोसायटी संचालक जालिंदर काळे, बंटी काळे, रामेश्वर काळे, विकी काळे, अजय काळे, राजेंद्र जाधव सह आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिंपोरा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
आमदार रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षांत शिंपोरा गावात विकासाचे एकही काम केले नाही. विकासाच्या नुसत्या थापा मारल्या, काम न करता नुसती जाहिरातबाजी केली. पण दुसरीकडे भूमिपुत्र आमदार प्रा.राम शिंदे यांनी शिंपोरा परिसरासाठी आवश्यक असलेला रस्त्याचा प्रश्न सोडवला. या गावाला जोडणारा रस्ता मंजुर केला.आपल्या मातीतला आपलाच भूमिपुत्र आपले प्रश्न सोडवू शकतो याची प्रचिती आल्याने शिंपोरा येथील प्रमुख अश्या जेष्ठ पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांच्या विकासाला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.विधानसभा निवडणुकीत भूमिपुत्र आमदार प्रा राम शिंदे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.
बागायती बाग व अडचणीतील भाग असलेल्या शिंपोरा रस्त्याच्या व परिसराच्या विकासाकडे रोहित पवारांनी गेल्या पाच वर्षांत कुठलेच लक्ष दिले नाही. शेवटी भूमिपुत्र आमदार प्रा.राम शिंदे साहेबांनी शिंपोरा भागातील रस्त्याचा मुख्य प्रश्न सोडवला. आता या भागातील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. शिंपोरा येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजुर करणार, असा शब्द त्यांनी खेडच्या सभेत दिलाय. त्याचबरोबर पुनर्वसन अंतर्गत शेती वस्ती पोहोच रस्ते करण्याचे प्रस्ताव त्यांनी शासनाकडे प्रस्तावित केले आहेत. ही सर्व कामे मार्गी लागण्याबरोबरच शिंपोरा भागाचा आमदार शिंदे साहेब हेच शाश्वत विकास करू शकतात अशी पक्की खात्री सर्वसामान्य जनता तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांची झाली आहे. म्हणूनच आपल्या मातीतल्या आपल्या हक्काच्या भूमिपुत्राला सर्वसामान्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढला आहे.शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. विरोधकांकडून काहीही वल्गना केल्या जात असल्या तरी ही निवडणूक जनतेने हातात घेतली असल्यामुळे राशीन गटातून शिंदे साहेबांना मोठे मताधिक्य मिळणार आहे.