Karjat jamkhed News : खंडाळा गोयकरवाडा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये राजकीय भूकंप, रोहित पवारांच्या हुकुमशाही कारभाराला कंटाळून दोन माजी सरपंच व २ ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांविरोधात तीव्र लाट निर्माण झाली आहे. रोहित पवारांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराला कंटाळून गावगाड्याच्या राजकारणातील प्रभावशाली नेते, कार्यकर्ते त्याचबरोबर जेष्ठ व युवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजपात प्रवेश करताना दिसत आहेत.खंडाळा गोयकरवाडा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये मोठा राजकीय धमाका झाला आहे. दोन माजी सरपंचासह दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व शेकडो युवकांनी रोहित पवारांची साथ सोडत भाजपात प्रवेश केला. या राजकीय भूकंपामुळे रोहित पवारांना जोरदार धक्का बसला आहे.
कर्जत जामखेडच्या स्वाभिमान आणि अभिमानासाठी भूमिपुत्रांनी पुकारलेल्या निर्णायक लढ्याला बळ देण्यासाठी खंडाळा गोयकरवाडा येथील स्वाभिमानी कार्यकर्ते एकवटले असून या कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठीशी आपली संपुर्ण ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार माजी सरपंच रघुनाथ खरात, माजी सरपंच रामहरी महारनवर, ग्रामपंचायत सदस्य दादा वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष माने या प्रमुख पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा कर्जत शहरात पार पडला.
खंडाळा – गोयकरवाडा ग्रुप ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये अशोक खंडेकर, विकास हुलगे, राम खंडेकर, आप्पा खंडेकर, लक्ष्मण खंडेकर, अक्षय हुलगे, जयराम माने, देवा खंडेकर, राहूल खंडेकर, सचिन गाडे, पिनू वाघमोडे, चंद्रकांत माने, हनुमंत टकले, कैलास पावणे, सतिश वलेकर, जयराम माने, विजय वाघमोडे, नवनाथ जेडगे, मोहन थोरात, गणेश खरात, विकास खंडेकर, अक्षय हुलगे, प्रदिप जगधने, प्रशांत गोयकर, सखाहरी माने, किरण महारनवर, नागेश जाधव, अभिषेक थोरात, अजित खरात, विलास माने, विशाल जगधने, सुयोग माने, अविनाश माने, हिरालाल जगधने, सचिन जोगदंड, नाथा हुलगे सह आदी शेकडो युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांनी आमदार व मंत्री म्हणून मतदारसंघात प्रचंड विकास कामे केली. कुकडीचे पाणी, तुकाई चारी, जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण कामे, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, महिला, सक्षमीकरण या क्षेत्रात त्यांनी भरिव काम उभे केले आहे.कर्जत-जामखेड मतदारसंघाला शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आमदार शिंदे हे प्रभावीपणे कार्यरत आहेत. एकिकडे लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा करत असताना त्यांनी आपला असो की विरोधी गटातला त्या सर्वांचा मानसन्मान राखण्याचे काम केले आहे. शिंदे यांनी आपल्या आजवरच्या राजकीय प्रवासात कधीच हुकुमशाही, दडपशाहीचा कारभार केला नाही.
मात्र कर्जत-जामखेडच्या जनतेने गेल्या पाच वर्षांत रोहित पवारांच्या हुकुमशाही आणि मनमानी कारभाराचा जो अनूभव घेतला, ते पाहता आता मतदारसंघातील कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता आता ‘आपल्या मातीतला आपला भूमिपुत्र आमदार हवा’ असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने एकवटू लागली आहे. आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रोज मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक भाजपात दाखल होत आहेत. एकुणच रोहित पवारांच्या मनमानी कारभाराविरोधात मतदारसंघात मोठी लाट निर्माण झाली आहे. यामुळे रोहित पवारांना रोज जोरदार धक्के बसताना दिसत आहेत.