जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात होताच जामखेड तालुक्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. गावोगावचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश करत आहेत. जामखेड तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचे गाव असलेल्या राजेवाडीत सोमवारी (४ रोजी) मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राजेवाडीतील ५१ प्रभावशाली युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे.
जामखेड तालुक्यात रोहित पवारांविरोधात जोरदार लाट निर्माण झाली आहे. रोहित पवारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गावोगावच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी रोहित पवारांची साथ सोडण्याचा धडाका लावला आहे. त्यानुसार राजेवाडीत राजकीय भूकंप झाला आहे. या गावातील प्रभावशाली युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी भाजपात प्रवेश केला.कर्जत-जामखेडच्या स्वाभिमान व अभिमानासाठी भूमिपुत्रांनी हाती घेतलेल्या निर्णायक लढ्यास राजेवाडीतील ग्रामस्थांनी बळ देण्याचा निर्णय घेतला. या राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादी अर्थात रोहित पवारांना जोरदार हादरा बसला आहे.
जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेतली व भाजपात प्रवेश केला. यामध्ये संजय दादा कुमटकर, सतीश अशोक निंबाळकर, दत्तात्रय नाना गोरे, सुभाष नामदेव शेंडकर, सुधीर आत्माराम कुमटकर, संभाजी मारुती कुमटकर, देविदास महादेव कुमटकर,बिभीषण बळीराम कुमटकर, विष्णू बिभीषण कुमटकर,बाळनाथ भगवान कुमटकर, संतोष अशोक निंबाळकर, अक्षय दत्तात्रय गोरे, नामदेव कचरू घुमरे, दिपक नाना गोरे, प्रशांत विक्रम गोरे, रोहित विक्रम गोरे, अभिमान साहेबराव कुमटकर,रामा नवनाथ गोरे, धनंजय अश्रूबा निंबाळकर, बाबासाहेब अंकुश निंबाळकर, तुकाराम लक्ष्मण शिकारे,दत्तात्रय कचरू कुमटकर, सुनिल बाबुराव कुमटकर, लक्ष्मण कल्याण कुमटकर, तुषार गौतम कुमटकर, अक्षय मोहन कुमटकर, विजय मोहन कुमटकर, रामा राजाभाऊ भोसले, विजय संजय देसाई, चांगदेव उत्तम कुमटकर, दिलीप देविदास कुमटकर, खंडू महादेव गोरे, अंकुश दादा साठे, हनुमंत किसन ढेरे, गणेश गोकुळ ढेरे, मोहन विश्वनाथ कुमटकर,दादा दत्तात्रय गोरे,बबन सूर्यभान निंबाळकर, रोहित दत्तात्रय निंबाळकर, बंडू गौतम कुमटकर, आदित्य नाना गोरे, हनुमंत श्रीराम कुमटकर, रमेश आत्माराम कुमटकर सह आदी युवा व जेष्ठ युवा कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
राजेवाडीचे सरपंच मोहन कुमटकर, उपसरपंच विक्रम गोरे, रामा गोरे मेजर, दत्ता गोरे, लहू कुमटकर, धनंजय कुमटकर, अभिमान कुमटकर, भाजपा तालुका सरचिटणीस उदयसिंह पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा चोंडी येथे पार पडला.