जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात राजकीय भूकंपाची मोठी लाट निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीत जामखेड तालुक्यातील अनेक गावांमधील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रोहित पवारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजपात प्रवेश घेण्याचा धडाका लावला आहे. अश्यातच जामखेड तालुक्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या रत्नापुर गावात दिवाळी पाडव्याच्या दिवशी मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथील हरिभाऊ वारे, आबासाहेब वारे, शुभम वारे, ऋषिकेश वारे, सुनील जाधव, अजय भंडारी, माऊली जाधव, हुसेन पठाण, रोहन ढवळे, श्याम जाधव, पांडू जाधव, ईश्वर देवा वराडे, देविदास कुर्लेकर, लक्ष्मण गायकवाड, गणेश संपत वारे, भाऊसाहेब जाधव या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह रोहित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. रत्नापुरात झालेल्या या राजकीय भूकंपाने जामखेड तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
कर्जत-जामखेडच्या स्वाभिमानासाठी व अभिमानासाठी भूमिपुत्रांनी पुकारलेल्या निर्णायक लढ्याला बळ देण्यासाठी रत्नापुरमधील स्वाभिमानी कार्यकर्ते एकवटले असून या कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याचा निर्णय घेत भाजपात प्रवेश केला. रत्नापुरातील या राजकीय भूकंपाने रोहित पवारांना जोरदार धक्का दिला आहे.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात, माजी सभापती डाॅ भगवान मुरूमकर, सभापती शरद कार्ले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, नगरसेवक अमित चिंतामणी, युवा मोर्चा शहराध्यक्ष संतोष गव्हाळे, जमीर बारूद, शाकीर खान, युवा नेते अभिजित राळेभात, चेअरमन अशोक महारनवर, युवा नेते सुहास वारे, पिंटू वस्ताद माने, अशोक मोरे, विकास मोरे, शरद मोरे, शैलेश कदम, दत्तात्रय गिरी, विलास मोरे, सुनिल बापू वारे, सह आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.