Karjat Jamkhed News : रोहित पवारांच्या हुकुमशाही विरोधात कोल्हेवाडीतील युवकांचे बंड, साकत ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंचासह शेकडो युवकांचा भाजपात प्रवेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांच्या हुकूमशाही कारभाराविरोधात मोठी लाट निर्माण झाली आहे.गावागावातील शेकडो युवक आणि प्रभावशाली व जनाधार असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने रोहित पवारांची साथ सोडताना दिसत आहेत. त्यातच आता जामखेड तालुक्यातील कोल्हेवाडीतील युवकांनी रोहित पवारांविरोधात बंड पुकारले आहे. कोल्हेवाडीच्या माजी उपसरपंचासह शेकडो युवकांनी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी प्रवेश करत खळबळ उडवून दिली.

Karjat Jamkhed News, Rebellion of the youth of Kolhewadi against Rohit Pawar's dictatorship, hundreds of youths joined BJP including the former sub-sarpanch of Sakat Group Gram Panchayat, latest news,

एकिकडे आमदार प्रा राम शिंदे यांनी कोल्हेवाडी भागाच्या विकासासाठी नेहमी निधी देण्याचे काम केले आहे. येथील नागरिकांचा कसल्याही प्रकारचा दुजाभाव न करता त्यांचे प्रश्न सोडवण्याची नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली. त्यांच्यावर सातत्याने प्रेम केले. त्यांच्या अडी अडचणी सोडवण्याचे काम केले. त्यांनी नेहमी स्थानिकांना विश्वासात घेऊन काम केले. कोल्हेवाडीच्या शाश्वत विकासासाठी आमदार शिंदे हे नेहमी आग्रही राहिले.

Karjat Jamkhed News, Rebellion of the youth of Kolhewadi against Rohit Pawar's dictatorship, hundreds of youths joined BJP including the former sub-sarpanch of Sakat Group Gram Panchayat, latest news,

मात्र दुसरीकडे रोहित पवार व त्यांच्या यंत्रणेने गेल्या पाच वर्षांत हुकुमशाही पध्दतीने कारभार केला. कोल्हेवाडीतील ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता कारभार केला. नागरिक व कार्यकर्त्यांनी काही प्रश्नांवर तक्रारी केल्या तर त्याकडे दुर्लक्ष करत मनमानी कारभार करण्यात आला.

याच मनमानी कारभाराला कंटाळून कोल्हेवाडीचे माजी उपसरपंच तथा साकत ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य बळीराम कोल्हे व शेकडो युवकांनी रोहित पवारांच्या मनमानी व हुकुमशाहीविरोधात बंड पुकारत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भाजपात प्रवेश केला. कोल्हेवाडीतील या राजकीय भूकंपाने रोहित पवारांना जोरदार धक्का बसला आहे.

Karjat Jamkhed News, Rebellion of the youth of Kolhewadi against Rohit Pawar's dictatorship, hundreds of youths joined BJP including the former sub-sarpanch of Sakat Group Gram Panchayat, latest news,

कर्जत-जामखेडच्या स्वाभिमानासाठी व अभिमानासाठी भूमिपुत्रांनी पुकारलेल्या निर्णायक लढ्याला बळ देण्यासाठी कोल्हेवाडीतील स्वाभिमानी युवा व जेष्ठ कार्यकर्ते एकवटले असून या सर्वांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आमदार रोहित पवारांच्या मनमानी कारभाराला वैतागून साकत ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बळीराम कोल्हे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश घडवून आणण्यासाठी भाजपाचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात व माजी सभापती डाॅ भगवान मुरूमकर यांनी पुढाकार घेतला होता.

Karjat Jamkhed News, Rebellion of the youth of Kolhewadi against Rohit Pawar's dictatorship, hundreds of youths joined BJP including the former sub-sarpanch of Sakat Group Gram Panchayat, latest news,

साकत ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बळीराम कोल्हे यांच्यासह भाऊसाहेब कोल्हे, अर्जुन नाना, अंगद मेजर, रामहरी कोल्हे मेजर, मनसूब कोल्हे, राम सरोदे, लाला उत्तम कोल्हे, श्रीकृष्ण कोल्हे, राम कोल्हे, सोमनाथ कोल्हे, भगवान कोल्हे, आस्तिक लक्ष्मण कोल्हे, अवधूत कोल्हे, लाला पांडुरंग कोल्हे, हनुमंत कोल्हे, राहुल कोल्हे, भगवान कोल्हे, बापूराव कोल्हे, देविदास सोपान कोल्हे, महादेव पवार, रमेश कोल्हे, बळीराम लक्ष्मण कोल्हे, संजय पुळवळे, दीपक बेंद्रे,लक्ष्मण कोल्हे, चिंतामणी कोल्हे, अवधूत कोल्हे,देविदास सखाराम कोल्हे ,राम सरोदे, सोमनाथ छगन कोल्हे, लक्ष्मण शिवाजी कोल्हे, नरसिंग कोल्हे, महादेव रामदास कोल्हे, सोन्याबाबु कोल्हे, या युवा कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.आपला तो आपलाच असतो, आपल्या माती आपली माणसं आपला नेता आपला रामभाऊ असे म्हणत कोल्हेवाडीतील युवकांनी रोहित पवारांना सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.

Karjat Jamkhed News, Rebellion of the youth of Kolhewadi against Rohit Pawar's dictatorship, hundreds of youths joined BJP including the former sub-sarpanch of Sakat Group Gram Panchayat, latest news,

यावेळी भाजपचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात, माजी सभापती डाॅ भगवान मुरूमकर, माजी उपसभापती रविंद्र सुरवसे, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, भाजपा शहराध्यक्ष पवनराजे राळेभात, संतोष गव्हाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष कोल्हे (मुकादम), ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक (दादा) कोल्हे सह आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा जामखेड शहरात पार पडला.