Karjat Jamkhed News : आमदार राम शिंदे यांना आर्थिक मदत करण्यासाठी स्वाभिमानी कार्यकर्ते व गोरगरिब जनता सरसावली, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जवळा ग्रामस्थांकडून ५१ हजाराची आर्थिक मदत !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदा होत असलेल्या निवडणूकीत धनशक्ती विरूध्द जनशक्ती असा थेट सामना होताना दिसत आहे. धनदांडग्या बलाढ्य अश्या रोहित पवाररूपी हुकुमशाही धनशक्तीला परतवून लावण्यासाठी गोरगरीब जनता आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी एकवटली आहे. या निवडणुकीत आमदार शिंदे यांना आर्थिक मदत करण्यासाठी मतदारसंघातील स्वाभिमानी कार्यकर्ते व गोरगरिब जनता सरसावली आहे. त्यानुसार जवळा ग्रामस्थांनी आमदार शिंदेंना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ५१ हजार रूपयांची रोख आर्थिक मदत केली. यावरून यंदाची विधानसभा निवडणूक गोरगरिब जनतेने हातात घेतल्याचे दिसू लागले आहे.

Karjat Jamkhed News, Self-respecting activists and poor people came together to help MLA Ram Shinde financially, 51 thousand from jawala villagers to contest elections, latest news,

यंदा होत असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत आमदार राम शिंदेंना विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी सर्वसामान्य गोरगरिब जनता वर्गणी गोळा करताना दिसत आहे. जमा झालेल्या वर्गणीतून आमदार शिंदेंना जनतेकडून आर्थिक बळ दिले जात आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वंजारवाडीतील गणेश जायभाय यांनी आमदार शिंदेंना २५ हजाराची पहिली आर्थिक मदत केली होती. त्यानंतर जवळा गावातील सर्वसामान्य गोरगरिब कार्यकर्ते व नागरिकांनी वर्गणी गोळा करून आमदार शिंदेंना ५१ हजार रूपयांची रोख आर्थिक मदत केली.

Karjat Jamkhed News, Self-respecting activists and poor people came together to help MLA Ram Shinde financially, 51 thousand from jawala villagers to contest elections, latest news,

रोहित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील बलाढ्य अश्या पवार कुटुंबातील सदस्य आहेत. ते हजारो कोटींचा व्यवसाय असलेल्या अनेक कंपन्या व साखर कारखान्यांचे मालक आहेत. रोहित पवाररूपी या बलाढ्य धनशक्तीने २०१९ च्या निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडत कर्जत जामखेड मतदारसंघातील गोरगरीब जनतेला भूलवण्याचे, गंडवण्याचे काम केले. पाच वर्षे इव्हेंटबाजी आणि जाहिरातबाजी करून आम्ही तुमच्यासाठी किती काम करतोय, तुम्ही आमच्या उपकाराखाली जगा हे दाखवण्याचा सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केला. यातून सर्वसामान्य गोरगरिब जनता प्रचंड दुखावली.परंतू आता याच गोष्टींचा बदला घेण्यासाठी सर्वसामान्य गोरगरिब जनता २०२४ च्या निवडणुकीत रोहित पवाररूपी हुकुमशाही धनशक्तीला धडा शिकवण्यासाठी मोठ्या ताकदीने एकवटल्याचे दिसू लागले आहे. या जनतेने यंदाच्या निवडणुकीत आमदार राम शिंदेंना आर्थिक बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक गावांमधून वर्गणी गोळा करून त्यांना आर्थिक मदत करण्यास सुरूवात झाली आहे.

Karjat Jamkhed News, Self-respecting activists and poor people came together to help MLA Ram Shinde financially, 51 thousand from jawala villagers to contest elections, latest news,

गोरगरिब सर्वसामान्य जनतेची दु:ख जाणून घेणारा, त्यांचे प्रश्न सोडवणारा, त्यांना मानसन्मान देणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा, दमबाजी आणि दडपशाही न करणारा, मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी कार्यतत्पर असणारा नेता अशी ओळख असलेल्या आमदार राम शिंदेंना जवळा ग्रामस्थांनी लोकवर्गणी करत ५१ हजार रूपयांची आर्थिक मदत केली. रोहित पवार या धनदांडग्या विरोधात निवडणूक लढवताना आमदार शिंदे यांची आर्थिक बाजू कमकुवत ठरू नये यासाठी स्वाभिमानी कार्यकर्ते व गोरगरिब जनतेकडून शिंदे यांच्यासाठी लोकवर्गणी केली जात आहे. हे सर्व स्वयंस्फूर्तीने घडत आहे. जनता भूमिपुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.

Karjat Jamkhed News, Self-respecting activists and poor people came together to help MLA Ram Shinde financially, 51 thousand from jawala villagers to contest elections, latest news,

३ नोव्हेंबर रोजी जवळा ग्रामस्थांनी आमदार प्रा.राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी रात्री भेट घेतली. समोर कितीही मोठी शक्ती असू द्या, काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, पैश्याची काळजी करू नका, आम्ही अजून वर्गणी करू, तुम्ही लढत रहा, तुमच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू, असा विश्वास देत जवळा ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांना निवडणूक लढवण्यासाठी ५१ हजाराची आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी आमदार शिंदे हे भावनिक झाले होते.तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास यावेळी त्यांनी जवळा ग्रामस्थांना दिला.

Karjat Jamkhed News, Self-respecting activists and poor people came together to help MLA Ram Shinde financially, 51 thousand from jawala villagers to contest elections, latest news,

यावेळी माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, सावता ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद कोल्हे, मतेवाडीचे माजी सरपंच सुखदेव अप्पा मते, युवा नेते बाळू मते, युवा सेना तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, डॉ ईश्वर हजारे, हबीबभाई शेख, सुभाष अप्पा रोडे, प्रदीप हजारे, महादेव हजारे, पांडुरंग रोडे, संदीप माने, भाऊसाहेब महारनवर, विष्णू कोल्हे व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळा गावातील तरूणांनी स्वयंस्फुर्तीने एकत्रित येत आमदार शिंदे यांना ५१ हजाराची आर्थिक मदत सोपवली. तरूणांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.