Karjat Jamkhed News : आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दरडवाडीतील युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात रोहित पवारांविरोधात मोठी त्सुनामी आली आहे. कर्जत-जामखेडच्या स्वाभिमान व अभिमानासाठी भूमिपुत्रांनी हाती घेतलेल्या निर्णायक लढ्यास सर्वसामान्य जनतेचा प्रचंड पाठिंबा वाढला आहे.दरडवाडीतील युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनीही या लढ्यास बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांनी स्वयंस्फूर्तीने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे. दरडवाडीत झालेल्या या राजकीय भूकंपाने रोहित पवारांना जोरदार हादरा बसला आहे.

Karjat Jamkhed News, Under the leadership of MLA Prof. Ram Shinde, youth and senior activists of Dardwadi joined BJP, latest marathi news today

कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. मतदारसंघातील स्वाभिमानी जनता आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी प्रचंड संख्येने एकवटली आहे. गावागावातील युवा व जेष्ठ कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात भाजपात दाखल होत आहेत. त्यानुसार जामखेड तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचे गाव असलेल्या दरवाडीतील ५० प्रभावशाली युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे.

Karjat Jamkhed News, Under the leadership of MLA Prof. Ram Shinde, youth and senior activists of Dardwadi joined BJP, latest marathi news today

जामखेड तालुक्यात रोहित पवारांविरोधात मोठी लाट निर्माण झाली आहे. रोहित पवारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गावोगावच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी रोहित पवारांची साथ सोडण्याचा धडाका लावला आहे. त्यानुसार दरडवाडीत राजकीय भूकंप झाला आहे. या गावातील प्रभावशाली युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी भाजपात प्रवेश केला. कर्जत-जामखेडच्या स्वाभिमान व अभिमानासाठी भूमिपुत्रांनी हाती घेतलेल्या निर्णायक लढ्यास दरडवाडीतील ग्रामस्थांनी बळ देण्याचा निर्णय घेतला. या राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादी अर्थात रोहित पवारांना जोरदार हादरा बसला आहे.

भाजपा नेते रविंद्र सुरवसे, संजय गोपाळघरे, बाळासाहेब गिते यांच्या पुढाकारातून दरवाडी येथील चेअरमन कृष्णा दराडे, बाबू दराडे, अशोक दराडे, विशाल सानप, उध्दव दराडे, भाऊसाहेब दराडे, संभाजी दराडे, रवी दराडे,भीमराव दराडे, महादेव दराडे, रोहिदास दराडे, संतोष खाडे, अक्षय लाड, भरत दराडे, हौसराव दराडे,बाळू दराडे, काकासाहेब दराडे, बाबा दराडे, शंकर पौडमल, शिवराज सुके,हरी आबा खाडे, तुषार सानप,अक्षय दराडे, वैभव दराडे,विशाल सानप,बाळू दराडे, नवनाथ दराडे,शहादेव दराडे,विनोद दराडे,गोकुळ दराडे,धर्मराज दराडे,आप्पा दराडे,अंबादास दराडे, करण तांदळे,दत्ता दराडे,बंडू दराडे,बालाजी दराडे या युवा व जेष्ठ युवा कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.