जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्याच्या राजकारणातील महत्त्वाचे गाव असलेल्या तेलंगशी मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या गावातील १०० युवकांनी जेष्ठ कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. रोहित पवारांची साथ सोडून हे सर्व कार्यकर्ते आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात दाखल झाले. या राजकीय भूकंपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रोहित पवारांच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराविरोधात जामखेड तालुक्यातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात बंड करू लागल्याचेच दिसू लागले असून या घडामोडींमुळे रोहित पवारांचे धाबे दणाणून गेले आहेत.
तेलंगशी हे जामखेड तालुक्याच्या राजकारणातील महत्त्वाचे गाव आहे.राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या या गावामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कर्जत जामखेडचा स्वाभिमान आणि अभिमानासाठी भूमिपुत्रांनी उभारलेल्या निर्णायक लढ्याला बळ देण्याचा मोठा निर्णय येथील युवा वर्गाने घेतला आहे. ‘गर्व से कहो हम भूमिपुत्र है’ असे म्हणत १०० युवकांनी जेष्ठ कार्यकर्त्यांसमवेत मंगळवारी रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. युवा वर्गाने घेतलेल्या या निर्णयामुळे रोहित पवारांना जोरदार हादरा बसला आहे.
भाजपा नेते माजी उपसभापती रविंद्र सुरवसे व बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे यांच्या पुढाकारातून व आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तेलंगशी येथील युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये युवा नेते आप्पा मोहन ढाळे, पोपट मोरे, अक्षय मोरे,नितीन ढाळे, अशोक ढाळे, विष्णू ढाळे, शुभम ढाळे, अंकुश ढाळे, संभाजी ढाळे, ऋषिकेश जाधव, अतीकेश कदम, अगस्थी कातोरे,गणेश ढाळे, विष्णू मुंडे,वैभव मुंडे, दादा मुंडे, कानिफ मुंडे, निलेश कातोरे, माऊली वायभासे, धनु चौरे, प्रदीप ढाळे, ऋषिकेश ढाळे, महेश ढाळे, अवी जावळे, अण्णा बेंद्रे, दत्ता ढाळे, समाधान मोरे, बिबीशन मोरे, ओंकार मोरे, रोहन मोरे, धनंजय मोरे, अभिषेक मोरे, विजय मोरे, किरण पडवळ, दत्ता मोरे, राजू मोरे, दत्ता ढाळे,प्रशांत मोरे,अर्जुन शिंदे, माऊली मोरे, महादेव पारखे, विशाल गायकवाड, अमोल साठे,अक्षय साठे, अशोक मोरे, हनुमंत मोरे, सनी मोरे, लक्ष्मण ढाळे,हर्षद पवार, बल्लु ढाळे, गणेश जाधव,विजय जायभाय या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय (दादा) काशिद, माजी सभापती डाॅ भगवान मुरूमकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ, सोमनाथ पाचरणे, केशव वनवे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, लहू शिंदे, मनोज राजगुरू, माजी सरपंच संजय गोपाळघरे, महालिंग कोरे, बाळासाहेब गिते, संदिप जायभाय, अमोल शिंदे, दत्ता ढाळे गणेश नेहरकर, सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.