Jamkhed Kharda News : व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करूनही अवास्तव व्याजाची मागणी करून कोरे धनादेश घेणाऱ्या धामणगावच्या (Dhamngaon) खाजगी सावकाराविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला (kharda police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत. (Jamkhed News Today Kharda)
याप्रकरणी बाजीराव मोहन बहादुरे (Bajirao Mohan Bahadure (रा. तेलंगशी, ता. जामखेड, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस स्टेशनला अशोक रामहरी सुरवसे (Ashok Ramhari Suravase) (रा.धामणगाव, ता. जामखेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kharda news)
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी अशोकराव रामहरी सुरवसे याच्याकडून ३ टक्के व्याजाने १ लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात ४० हजार ५०० रुपये व्याज देण्यात आले; परंतु सावकार अशोक सुरवसे याने ३ टक्क्यांऐवजी ४ % दराने व्याजाने पैशांची मागणी सुरू केली. (Jamkhed Kharda latest news)
तसेच सावकाराने फिर्यादीकडून घेतलेल्या कोऱ्या धनादेशाचा वापर करून त्यावर एक लाख ३५ हजार रुपये, अशी रक्कम टाकून फिर्यादीच्या अकाउंटमधील पैसे आरोपीने परस्पर काढून घेत आवास्तव व्याजाची मागणी करून त्रास देऊ लागला, त्यामुळे फिर्यादी व त्यांची पत्नी यांनी खर्डा पोलीस स्टेशनला (Kharda Police Station) फिर्याद दाखल केली. त्यावरून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलिस करत आहेत. (Kharda news today)