खर्डा परिसरातील गावांमध्ये रानडुकरांचा धुमाकुळ; वनविभाग गाढ झोपेत

जामखेड : जामखेड तालुक्यात एकिकडे बिबट्याची दहशत असतानाच आता खर्डा परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे.ज्वारीच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तर वनविभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसुन येत आहे.

सुगीच्या भरण्याच्या दिवसात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी भीतीच्या सावटाखाली भरणे करताना दिसून येतो. खर्डा परिसरासह जामखेड तालुक्यात शेतकरी दहशती खाली पाहावयास मिळतो. जामखेड तालुक्यात शेजारील तालुक्यात बिबट्याने शेतकऱ्यावर शेतात हल्ला करून ठार केलेल्या घटना ताज्या असतानाच पाळीव प्राण्यांवर हल्ला करून ठार केल्यामुळे शेतकरी वर्गात बिबट्याची दहशत पसरली आहे.
सध्या रब्बी पिकांना पाणी देण्याचे काम चालू आहे कारण या परिसरात प्रमुख पीक असलेल्या ज्वारी पिकांना पाणी देण्याचे काम चालू आहे. सर्वत्र विद्युत पंपाने पाणी देण्याचे काम चालू असतानाच महावितरण अतिरिक्त भार पडत असल्याने काही भागात एक आठवडा रात्री तर काही भागात दिवसा लाईट असल्यामुळे रात्री पाळीत शेतकरी एकटा-दुकटा शेतात जाण्यासाठी धजावत नाही.

खर्डा व परिसरात बालाघाट डोंगर रांगांच्या कुशीत वसलेला भाग असल्याने शेती हे प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन आहे .शेतकरी रात्रभर फटाके वाजवणे, हलगी ताशा वाजवणे, घराभोहोती शेकोट्या रात्रभर पेटवणे, विविध आवाज करून रात्रभर जागरण करून शेतकरीवर्ग रात्र जागवत आहे.

पावसाळ्याच्या सुरवातीला यंदा पाऊस चांगला झाला त्यामुळे खर्डा परिसरात प्रमुख पीक असलेल्या ज्वारी मोठ्या प्रमाणात पेरणी केली. सध्या पोटार्यात आली आहे तर काहींची मागास ज्वारी भरास आली आहे. ज्वारीचे महागडे बियाणे ,खते पाणी घालून ज्वारी जोमात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळणार अशी अपेक्षा असताना बिबट्या च्य दहशत व रानडुकरांच्या धुमाकूळ यामुळे शेतकरी वर्गात दिसून येते .

तेलंगशी येथील दिनकर डोळे यांचे वासरू परवा रात्री हमला करून खाल्ले, बिबट,लांडगा की तरस अशा संभ्रमात सध्या वनविभागाचे कर्मचारी सह शेतकरी दिसून येतो.रानडुकरं सह बिबट्याचा बंदोबस्त करावी अशी मागणी शेतकरी करताना दिसून येतो. खर्डा व परिसरात सोशल मीडियावर व फोन करून या गावातून त्या गावात रात्रीचे फोन करून ईकडे बिबट्याला तिकडे बिबट्याला अमुकला दिसला तमुकला दिसला अशा चर्चा रंगते. अफवा की खरे याचा उलगडा शेतकऱ्यांना होत नाही. हे खरे आहे की अफवा याचा शहानिशा न होत असल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.