जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. अनेक आमदार, खासदार, मंत्री राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत.आमदार रोहित पवार हे सुध्दा कोरोनाबाधित झाले आहेत. रोहित पवार यांच्या प्रकृती स्वास्थासाठी कर्जत जामखेड मतदारसंघात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अभिषेक आणि महा आरती केल्या जात आहेत.
आमदार रोहित पवार हे कोरोनातून लवकर बरे व्हावेत यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे यांच्या पुढाकारातून जवळा ग्रामस्थांनी ग्रामदैवत जवळेश्वराला साकडे घातले आहे.
आमदार रोहित पवार लवकरात लवकर कोरोनातून बरे व्हावेत यासाठी मतदारसंघातील गावोगावचे कार्यकर्ते गावोगावी अभिषेक, महा आरती, पुजा, प्रार्थना, करताना दिसत आहेत. आमदार रोहित पवारांप्रती असलेल्या काळजीपोटी कार्यकर्ते आपापल्या ग्रामदैवताला साकडे घालताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या या प्रेमाने आमदार रोहित पवारही भारावून गेले आहेत.
जवळा ग्रामस्थांन आमदार रोहित पवार हे कोरोनातून लवकर बरे व्हावेत यासाठी ग्रामदैवत जवळेश्वर मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते. रोहित पवार लवकर कोरोनातून बरे व्हावेत याकरिता जवळेश्वराला साकडे घालण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा सरपंच प्रशांत शिंदे, माजी उपसभापती दीपक पाटील,राष्ट्रवादी युवा नेते राहुल पाटील, अशोक पठाडे, अमोल हजारे, अनिल हजारे, मारुती गोरे, अविनाश पठाडे, रघुनाथ मते, भाऊ कसरे, दयानंद कथले सह आदी कार्यकर्त्यांनी महाआरतीत सहभाग घेतला.
दरम्यान कर्जत – जामखेड मतदारसंघासह राज्यातील वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांकडून आमदार रोहित पवार कोरोनातून लवकर बरे व्हावेत यासाठी विविध धार्मिक ठिकाणी साकडे घालताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून पवार कुटुंबीय भारावून गेले आहे.