जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कृषि संस्कृतीत सर्वात महत्वाचा सण म्हणून ओळखला जाणारा बैल पोळा हा सण गुरूवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार प्रा राम शिंदे यांनी आपल्या चोंडी या गावी बैलपोळा हा सण पारिवारिकपणे साजरा केला. जामखेड तालुक्यात दुष्काळाचे सावट असतानाही बैलपोळा सण शेतकरी बांधवांनी उत्साहात साजरा केला.
आमदार प्रा राम शिंदे यांनी परिवारातील सदस्य सुभाष मारूती शिंदे यांच्या शेतात संपूर्ण परिवारासह बैलपोळा हा सण साजरा केला. यावेळी अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते. आमदार शिंदे यांनी यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना बैलपोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाचारणे, पांडुरंग उबाळे, अशोक देवकर, उद्योजक विशाल शिंदे, आप्पासाहेब उबाळे, मिलींद देवकर, शंकर शिंदे, आलेश शिंदे, अशोक शिंदे, सुदाम मोरे, सुनिल शिंदे, राजेंद्र शिंदे, श्रीकांत शिंदे, रवि शिंदे, अजिंक्य शिंदे, प्रकाश शिंदे, साहिल शेख, तुषार मोरे, आकाश शिंदे सह आदी उपस्थित होते