Monsoon 2023 Update: अखेर मान्सून जामखेड तालुक्यात दाखल, कोसळू लागल्या रिमझिम पावसाच्या धारा, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Monsoon 2023 Update : गेल्या महिनाभरापासून प्रतिक्षेत असलेला मान्सून शनिवारी जामखेड तालुक्यात दाखल झाला. जामखेड तालुक्यातील अनेक भागात सायंकाळपासून मान्सूनच्या रिमझिम सरी बरसत आहेत. पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत. रविवारी दुपारपासून पुन्हा रिमझिम सरी बरसू लागल्या आहेत. (Jamkhed पाऊस)
बिपरजाॅय चक्रीवादळामुळे रखडलेला मान्सून महाराष्ट्रातील अनेक भागात शनिवारी दाखल झाला. बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने मान्सूनचा प्रवासावर सुखकर झाला आहे. त्यामुळे शनिवारी मान्सून वारे राज्यात सक्रीय झाले. दुपारनंतर मान्सूनचे ढग राज्याच्या वेगवेगळ्या पहायला मिळाले. जामखेड तालुक्यात सायंकाळ नंतर मान्सूनच्या ढगांची दाटी झाल्याचे पहायला मिळाले. तालुक्यात अनेक भागात रिमझिम पाऊस बरसत आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज रविवारी दुपारपासून पुन्हा रिमझिम पावसास सुरुवात झाली आहे.
राज्याच्या अनेक भागात शनिवारी पावसाने हजेरी लावली.अहमदनगर जिल्ह्यातही अनेक भागात हलका पाऊस झाला.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील देवी भोयरे सह आदी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे या भागातील नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. शेतात पाणीच पाणी झाले होते. सोलापुर शहराला पावसाने झोडपले. पहिल्याच पावसात सोलापुर शहरवासियांची तारांबळ उडाली होती.
मुंबईत पहिलाच पावसाने दोघांचे बळी घेतले. गोवंडी शिवाजीनगर नवीन डेपोच्या शेजारील नाल्यात पडून दोघांचा मृत्यू झाला. शनिवारी मुंबई आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. येत्या दोन दिवसांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.