जामखेड : सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई सोनवणे यांनी आयोजित केलेल्या नायगाव महोत्सवाची जामखेड तालुक्यात रंगलीय जोरदार चर्चा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा | लावणी म्हटलं की महाराष्ट्राच्या नजरेसमोर एकच नाव समोर येतं ते म्हणजे सुरेखा पुणेकर यांचं, गेल्या अनेक वर्षांपासून सुरेखा पुणेकर यांनी महाराष्ट्राची अस्सल परंपरा असलेल्या लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. तरूणांसह पुरूष वर्ग जसा त्यांच्या लावण्यांचा चाहता वर्ग आहे, तसेच महिला वर्गातही त्यांच्या लावण्यांना मोठी पसंती आहे. जामखेड तालुक्यातील नायगावमध्ये शिवजयंती आणि ग्रामदैवत नाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई सोनवणे यांनी नायगाव मोहत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नायगाव महोत्सवात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि गायिका राधा खुडे यांनी सादर केलेल्या अप्रतिम कलाविष्काराने हजारो रसिकांची मने जिंकली. नायगाव महोत्सवाची संपुर्ण तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
उच्चशिक्षित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा नायगाव ग्रामपंचायतच्या सदस्या संध्याताई सोनवणे यांनी शिवजयंती आणि नायगावचे ग्रामदैवत नाथ महाराज यात्रेनिमित्त नायगाव महोत्सवाचे नुकतेच आयोजन केले होते. या महोत्सवासाठी सोनवणे यांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि पाव्हन जेवलात काय? या गाजलेल्या गाण्याच्या गायिका राधा खुडे यांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात महिला वर्गाने गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि गायिका राधा खुडे यांनी सादर केलेल्या प्रत्येक कलाविष्काराला उपस्थित महिलांनी प्रचंड दाद दिली. रात्री बारापर्यंत हा कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रमात कुठलीही गडबड गोंधळ न होता कार्यक्रम शांततेत पार पडला.
सुरेखा पुणेकर आणि राधा खुडे प्रथमत जामखेड तालुक्यातील एका लहानश्या खेड्यात आल्या होत्या, त्यांची कला पाहण्यासाठी महिलांसह नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. नायगाव महोत्सवात दोन्ही कलाकारांनी सादर केलेल्या अप्रतिम कलाविष्काराने नायगाव महोत्सव जामखेड तालुक्यात चांगलाच गाजला आहे. नायगाव महोत्सव आणि या कार्यक्रमाच्या आयोजिका सामाजिक कार्यकर्त्या संध्यात़ाई सोनवणे जामखेड तालुक्यात चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ साहेब,पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड ,खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, प्रा सचिन गायवळ, रमेश आजबे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद,संजय बेरड, बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर, नरेंद्र पाचारे, सुरज काळे, प्रसाद कर्णावत, वैभव कारले,गणेश घायतडक, राजमुद्रा ग्रुप, मावळा ग्रुप खर्डा,हिरामोती उद्योग समूह ,सचिन आजबे आणि सर्व नायगाव आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.