National Food Security Act | रेशन दुकानदार लुटतोय ? सतावतोय ? धान्य कमी देतोय ? मग फिरवा ‘हा’ नंबर अन लावा त्याला कामाला
रेशन दुकानदारांच्या मनमानीमुळे परेशानआहात ?
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : देशातील गोरगरीब कुटुंबांच्या भुकेचा प्रश्न मिटावा याकरिता सरकारकडून रेशनकार्डांच्या (Ration card) माध्यमांतून स्वस्त दरात किंवा काही कुटूंबांना मोफत स्वरूपात धान्य पुरवले जाते. देशातील गोरगरीबांचे भूकबळी जाऊ नये यासाठी केंद्र सरकारने देशभरात अन्न सुरक्षा कायदा (National Food Security Act) लागू केलेला आहे.
सध्या आपण कोरोना महामारीचा सामना करत पुढे जात आहोत. सर्वच क्षेत्रात महामंदी आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खाणारे पोट अन कमवते हात यात आता मोठा फरक पडला आहे. पोटाची खळगी कशी भरावी याची भ्रांत सर्वांनाच सतावत आहे. (National Food Security Act)
परंतु (National Food Security Act ) अन्न सुरक्षा कायद्यान्वये रेशन कार्डांच्या (Ration card) माध्यमांतून अन्न मिळवण्याचा पर्याय जरी आपल्या सर्वांकडे असला तरी डीलर्स किंवा रेशन दुकानदारांच्या मनमानीमुळे रेशन कार्डधारकांना रेशन मिळणे दुरापास्त होते किंवा रेशन कमी दिले जाते, अश्यावेळी कुठे तक्रार करायची ? कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न सर्वांनाच सतावत असतो.जर तुम्ही देखील अशा कोणत्याही समस्येमुळे त्रस्त असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही.
अशा तक्रारींसाठी सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. जिथे तुम्ही थेट तक्रार करू शकता आणि आपल्या समस्येचे त्वरित निराकरण करू शकता. विशेष म्हणजे, हे हेल्पलाइन नंबर वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे आहेत. या हेल्पलाइन नंबरद्वारे तुम्ही रेशनकार्डमध्ये (Ration card) नव्या सदस्याचे नाव देखील जोडू शकता. तसेच अनेकदा असे दिसून येते की, रेशन कार्डसाठी अर्ज करूनही अनेकांना अनेक महिने रेशन कार्ड मिळत नाहीत अशा परिस्थितीत, लोक या सुविधेद्वारे सहजपणे त्याची तक्रार देखील करू शकतात. महाराष्ट्रातील नागरिकांनी आपल्या तक्रारी 1800224950 या नंबरवर करायच्या आहेत. या नंबरवर तुमची तक्रार नोंदविल्यानंतर तातडीने कार्यवाही सुरू होते.(National Food Security Act)
आपल्या राज्याचा टोल फ्री नंबर मिळवायचा असेल तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या लिंकवर भेट देऊन सुध्दा तुम्ही काढू शकता.(Ration card) जर तुम्हाला स्थानिक पातळीवर तक्रार करायची असेल तर थेट संबंधित तालुक्यातील स्थानिक आमदार, तहसिलदार व पुरवठा निरीक्षक यांच्याकडे संबंधित रेशन दुकानदाराची तक्रार करू शकता.याठिकाणीही तुमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जाऊ शकते. (National Food Security Act)
धान्याचा काळाबाजार करणार्या बोक्यांना धडा शिकवण्यासाठी सजग नागरिकांनी सरकारच्या हेल्पलाइन नंबरवर माहिती दिल्यास धान्याचा होणारा काळाबाजार रोखण्यास यातून मोठी मदत होऊ शकते. National Food Security Act)