जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड तालुक्यातील हळगाव पिंपरखेड परिसरात शेतीसाठी पुरवल्या जाणाऱ्या वीजेच्या भारनियमनात मोठी वाढ झाली होती. यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला होता. सततच्या भारनियमनाला वैतागलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमदार रोहित पवार यांचे समर्थक सुशेन ढवळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केलेल्या अंदोलनाच्या दणक्यामुळे शेतीचा वीजपुरवठा आता सुरळीत झाला आहे.
जामखेड तालुक्यातील हळगाव पिंपरखेड सह आदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून भारनियमनात मोठी वाढ झाली होती.दर पाच मिनिटांला लाईट जायची.यामुळे या भागातील बळीराजा पुरता वैतागून गेला होता.यामुळे शेतकरी वर्गात महावितरण विरोधात संतापाची लाट पसरली होती.
विजेच्या सततच्या लपंडावामुळे हैराण झालेल्या शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांचे सुपुत्र तथा हळगावच्या सरपंच अनिताताई ढवळे यांचे पती सुशेन ढवळे यांनी हळगाव व पिंपरखेडमधील आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत महावितरणच्या अरणगाव वीज उपकेंद्र गाठले. विजेच्या सततच्या लंपडावाला वैतागून त्यांनी महावितरण कार्यालयास कुलूप ठोकण्याचे अंदोलन केले होते.
या अंदोलनावेळी अंदोलकांनी आमदार रोहित पवार यांना फोन लावत आपली कैफियत मांडली होती. यावेळी आमदार पवार यांनी शेतकऱ्यांचा भावना ऐकुन घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सुचना दिल्या, त्यानंतर अंदोलकांनी आपले अंदोलन मागे घेतले.
दरम्यान, हळगाव व पिंपरखेड या भागातील शेतीसाठी वीज पुरवठा करणार्या लिंकींग लाईनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने दर पाच मिनिटांला या भागातील लाईट ड्राॅप होत होती. शेतकऱ्यांच्या अंदोलनानंतर महावितरणने तांत्रिक बिघाड तातडीने दुरूस्त केला.
यामुळे आता हळगाव पिंपरखेड परिसरातील शेतीचा वीज पुरवठा सुरळीत झाला. हे यश राष्ट्रवादीचे नेते सुशेन ढवळे व पिंपरखेडचे चेअरमन पांडुरंग ढवळे, आणि त्यांचे सहकारी जनार्दन लबडे, आप्पा कापसे, बाळासाहेब ढवळे, बाबा खोटे, संतोष झिंजाडे, संतोष आधुरे, दत्तात्रय रोही यांनी केलेल्या अंदोलनाचे आहे तसेच या अंदोलनावेळी आमदार रोहित पवार यांनी वेळीच दखल घेतल्यामुळे विजेची मोठी समस्या दुर झाली. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.