पाटोदा ग्रामस्थांच्या वतीने रत्नापुर आणि खडकत ग्रामपंचायत सदस्यांचा नागरी सत्कार संपन्न, माजी सरपंच गफ्फारभाई पठाण मित्रमंडळाचा उपक्रम !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील रत्नापुर आणि आष्टी तालुक्यातील खडकत येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण मित्रमंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने रत्नापुर ग्रामपंचायतचे सदस्य मुन्नाभाई शेख, सचिन महारनवर, रामदास साळवे तसेच आष्टी तालुक्यातील खडकत ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच शांतीलाल भिमराव काटे, ग्रामपंचायत सदस्य ललीत जेवे,बाळू निंबाळकर,रामा कसबे, प्रभु सुर्येवंशी, बाळु ऊदमले, करण भालेराव, अहमद कुरेशी, अशोक गाडेकर, महम्मद कुरेशी यांचा नागरी सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सभापती दत्तात्रय जेवे, शकीलभाई कुरेशी,आदम शेख, नाना काटे, रंजीत परदेशी, माजी सरपंच समीर भाई पठाण, मच्छिंद्र लंगे, प्रकाश कडु, शहाजी नवले, विश्वनाथ मोरे, रोहीदास घोलप, बबन कात्रजकर,चेअरमन अशोक महारनवर, मधुकर महारनवर,विश्वनाथ चव्हाण, रामकिशन जायभाय, विनायक महानवर, निवृत्ती महाराज, शहाजी महारनवर, विनायक महानवर,अन्सार पठाण,बाबासाहेब कदम,दादा महारनवर, सुकदेव शिकारे, प्रकाश कडु, मोरे सर, सिराज शेख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.