जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जवळेश्वर रथयात्रेनिमित्त जवळ्यात कुस्तीचे जंगी मैदान पार पडले. यावेळी झालेल्या कुस्तीच्या हगाम्यामध्ये करमाळा, जामखेड,आष्टी, कर्जत, जेऊर सह जवळा परिसरातील पैलवानांनी सहभाग घेतला होता. (On the occasion of Jawaleshwar Rath Yatra battle of wrestlers match took place)
जामखेड तालुक्यातील जवळा येथील श्री जवळेश्वर रथयात्रे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या दंगलीत संकेत हजारे आणि रोहित आव्हाड या पैलवानांंनी कुस्तीचे मैदान गाजवले. या आखाड्याच्या आयोजनासाठी आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
मुख्यमंत्र्यांना विनंती अन् राम शिंदेंवर पवारांचा निशाणा, कर्जत दिवाणी न्यायालय स्थगितीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया आली समोर
संकेत हजारे व रोहित आव्हाड यांनी मारली बाजी
एकवीस हजार इनामाची कुस्ती जवळा गावचा सुपुत्र पैलवान रोहित आव्हाड व करमाळ्याचा पैलवान यांच्यात झाली. तर दुस-या क्रमांकाची अठरा हजार रूपये इनामाची कुस्ती जवळा गावचा सुपुत्र पैलवान संकेत हजारे व जेऊरचा पैलवान यांच्यामध्ये पार पडली. यामध्ये संकेत हजारे व रोहित आव्हाड यांनी बाजी मारली.
महाराष्ट्र केसरीचे पिताश्री आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांच्या पिताश्रींची हजेरी.
कुस्ती हगाम्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवरेचे पिताश्री महाराष्ट्र चॅम्पियन बाळासाहेब आवारे तसेच महाराष्ट्र केसरी बालारफी शेख यांचे पिताश्री आदम शेख हे या कुस्ती हगाम्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कुस्तीचे पंच
कुस्तीचे पंच म्हणून बाबा महारनवर,संजय आव्हाड, राजू भैय्या सय्यद ,सुग्रीव ठकाण, राहुल आव्हाड यांनी नियोजन पाहिले.
कुस्तीच्या मैदानास या मान्यवरांची होती उपस्थिती
यावेळी ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे चेअरमन आजीनाथ हजारे, उपाध्यक्ष दशरथ हजारे, जवळा सोसायटीचे चेअरमन शहाजी (आप्पा) पाटील, माजी उपसभापती दिपक पाटील, सरपंच प्रशांत शिंदे, संतराम सूळ, प्रशांत पाटील , उद्योजक रणजीत पाटील, अशोक पठाडे, गौतम कोल्हे,राहुल पाटील, डाॅ.दिपक वाळुंजकर, राजेंद्र महाजन,उमेश रोडे, डाॅ.ईश्वर हजारे, विष्णू हजारे, रोहिदास मासोळे उपस्थित होते.