Onion Subsidy Maharashtra 2023 : कांदा अनुदानास अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्या – सभापती शरद कार्ले यांचे पणन मंत्र्यांना साकडे !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Onion Subsidy maharashtra 2023 : कांदा अनुदानाचा (kanda anudan 2023) लाभ मिळवण्यासाठी जामखेड तालुक्यातील 2682 शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे अर्ज केले होते. त्यापैकी 1113 शेतकऱ्यांचे अर्ज कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे अपात्र ठरविण्यात आले आहेत.अपात्र शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. (Onion Subsidy maharashtra)
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रति क्विंटल 350 रूपये कांदा अनुदान (kanda Anudan 350) जाहीर केले आहे. या अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री केलेले शेतकरी पात्र ठरणार आहेत. कांदा अनुदान (kanda anudan 2023) मिळवण्यासाठी पणन विभागाने बाजार समित्यांच्या माध्यमांतून शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले होते. या अर्जाची छाननी प्रक्रिया पुर्ण झाली आहे. कोणत्याही क्षणी पात्र शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणार आहे. (Onion Subsidy maharashtra 2023)
कांदा अनुदानाचा (kanda anudan news) लाभ मिळण्याकरिता जामखेड तालुक्यातून 2682 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. या अर्जाच्या छाननीत 1569 शेतकरी अनुदानास पात्र ठरले आहेत. तर ऊर्वरीत 1113 शेतकरी कागदपत्रांच्या अपुर्णतेमुळे अपात्र ठरविण्यात आले आहेत. जामखेड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अनुदानापासून वंचित राहत असल्याची बाब स्पष्ट होताच बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी राज्याचे पणनमंत्री अब्दूल सत्तार यांच्याकडे पत्रव्यवहार करत मोठी मागणी केली आहे. (Onion Subsidy maharashtra 2023)
अपात्र शेतकऱ्यांच्या अर्जाची फेर तपासणी करून त्यांना अनुदानास पात्र करावे व अर्ज केलेला कुठलाही शेतकरी हा अनुदानापासून वंचित राहू नये, अशी मागणी सभापती शरद कार्ले यांनी पणनमंत्री अब्दूल सत्तार यांना पत्राद्वारे केली आहे. जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहू नयेत यासाठी शरद कार्ले यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून पणन मंत्र्यांना साकडे घातले आहे. (Onion Subsidy maharashtra 2023)