जामखेड : संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या हस्ते हाळगाव कृषि महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयास राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे नवनिर्वाचित संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीत त्यांनी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांच्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध विकासाच्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर डाॅ शिर्के यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे नवनिर्वाचित संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी हळगाव कृषि महाविद्यालयास 9 रोजी भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांनी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. या विशेष भेटी दरम्यान डॉ. शिर्के यांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनवणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. नजीर तांबोळी, पोपट पवार, अरुण पाळंदे व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.