Karjat Jamkhed News : देवदैठणमध्ये राजकीय भूकंप, सोसायटी चेअरमन, २ संचालक, दोन ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो प्रमुख युवा कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील देवदैठणमधील सोसायटी चेअरमन, दोन संचालक, दोन ग्रामपंचायत सदस्यांस १०० पेक्षा अधिक प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी व अभिमानासाठी सुरु असलेल्या ‘भूमिपुत्रांच्या’ लढ्याला ‘बळ’ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ‘आपला तो आपलाच’ असे म्हणत या सर्वांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला. दैवदैठणमधील या राजकीय भूकंपामुळे रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकीय ‘वारे’ रोहित पवारांविरोधात पुर्णता: फिरल्याचे यातून स्पष्ट होऊ लागले आहे.

Political earthquake in Daivadaithan, Society chairman, Two directors,2 Gram Panchayat members and 100 prominent youth workers join BJP, youth started leaving the support of Rohit Pawar, karjat jamkhed news today,

मंगळवारी मध्यरात्री जामखेड तालुक्यातील दोन गावांमध्ये मोठे राजकीय भूकंप झाले. पहिला भूकंप डोणगाव येथे झाला. डोणगावमधील ५० युवकांनी रोहित पवारांची साथ सोडली. त्यानंतर दुसरा भूकंप देवदैठणमध्ये झाला. देवदैठणमधील सोसायटी चेअरमन, दोन संचालक, दोन ग्रामपंचायत सदस्यांसह १०० प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी रोहित पवारांची साथ सोडली. रोहित पवारांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराविरोधात बंड पुकारत या  युवकांनी भाजपात प्रवेश केला.ऐन दिवाळीत झालेल्या या राजकीय धमाक्याने रोहित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे. या राजकीय भूकंपामुळे जामखेडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Political earthquake in Daivadaithan, Society chairman, Two directors,2 Gram Panchayat members and 100 prominent youth workers join BJP, youth started leaving the support of Rohit Pawar, karjat jamkhed news today,

भाजपा नेते संजय काका काशिद यांच्या पुढाकारातून व जामखेड बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, महारूद्र महारनवर यांच्या सहकार्यातून देवदैठण येथीलसोसायटी चेअरमन, दोन संचालक, दोन ग्रामपंचायत सदस्यांसह १०० प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा मंगळवारी मध्यरात्री चोंडी येथे पार पडला. यावेळी शिवसेना कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख दिपक जंजिरे, पांडुरंग उबाळे, नगरसेवक अनिल गदादे, लहू शिंदे, सुनिल यादव, संतोष गव्हाळे सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Political earthquake in Daivadaithan, Society chairman, Two directors,2 Gram Panchayat members and 100 prominent youth workers join BJP, youth started leaving the support of Rohit Pawar, karjat jamkhed news today,

ना पैसे, ना दबाव, ना बळजबरी, ना दमबाजी, ना दडपशाही, ना कसले प्रलोभन, अश्या कोणत्याही गोष्टींना बळी न पडता देवदैठण येथील १०० पेक्षा अधिक युवक व प्रमुख कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे आमदार राम शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दैवदैठणमधील सोसायटीचे चेअरमन महादेव भोरे, सुरेश तात्या भोरे,मकरंद भोरे, अतुल भोरे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ भोरे, ग्रामपंचायत सदस्य सतिश सरगर, शहाजी सरगर, योगेश हजारे, बाळू चिलगर, अमोल बनकर, सोसायटी संचालक बाबा चिलगर, सोसायटी संचालक संभाजी जमदाडे, सचिन हजारे, बाळासाहेब सरगर, भागवत सरगर, शहाजी सरगर, दत्ता जमदाडे, अमोल राऊत,

Political earthquake in Daivadaithan, Society chairman, Two directors,2 Gram Panchayat members and 100 prominent youth workers join BJP, youth started leaving the support of Rohit Pawar, karjat jamkhed news today,

प्रवीण बनकर, तानाजी महानवर, बाजीराव चिलगर, गणेश चिलगर, पांडुरंग चिलगर, उत्तम चिलगर, योगेश चिलगर, वैजनाथ चिलगर, सावता बनकर, संतोष जमदाडे, गणेश बनकर, राजेंद्र चिलगर, गणेश सरगर, कचरू सरगर, विकास राऊत, आबा चिलगर, योगेश हजारे, खंडेराव महानवर, अतुल भोरे, प्रशांत सरगर, गजेंद्र सरगर, दत्ता जावळे, काका धेंडे, बाळू चिलगर, भाऊ साठे, अभिषेक हजारे, नामदेव गुळवे, गुलाब सरगर, अशोक चिलगर, प्रदीप लाला भोरे,

Political earthquake in Daivadaithan, Society chairman, Two directors,2 Gram Panchayat members and 100 prominent youth workers join BJP, youth started leaving the support of Rohit Pawar, karjat jamkhed news today,

बबन तोरांबे, राम चिलगर, सुरेश भोरे, मेघराज बनकर, नारायण टिळेकर, पांडुरंग महानवर,राजेंद्र चिलगर, राज गर्जे, योगेश सरगर, लहू सरगर, अजय बनकर, सावता बनकर, गणेश बनकर, संतोष जमदाडे, प्रशांत बनकर,दादा जमदाडे, ज्ञानेश्वर महानवर, सतीश हजारे, ऋषिकेश भोरे, ज्ञानेश्वर चिलगर, लक्ष्मण चिलगर, तुषार हजारे,विकास राऊत, दीपक बनकर, गणपत बनकर, अक्षय बनकर, अमोल बनकर, दिनकर सरगर या १०० पेक्षा अधिक प्रभावशाली युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मंगळवारी मध्यरात्री आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.

जामखेड तालुक्यात घडत असलेल्या या राजकीय घडामोडी पाहता रोहित पवारांविरोधात मतदारसंघात मोठी लाट निर्माण झाल्याचेच यानिमित्ताने दिसू लागले आहे.