धामणगावमध्ये राजकीय भूकंप : उपसरपंच, तीन ग्रामपंचायत सदस्य व सहा सोसायटी संचालकांसह ५० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील धामणगावचे उपसरपंच, तीन ग्रामपंचायत सदस्य व सहा सोसायटी संचालक यांच्यासह ५० प्रभावशाली कार्यकर्त्यांनी रोहित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला.बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश सोहळा आमदार राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी रविवारी मध्यरात्री पार पडला. यावेळी भाजपा नेते रविंद्र सुरवसे, वैजीनाथ पाटील, सरपंच महारूद्र महारनवर, महालिंग कोरे हे यावेळी उपस्थित होते.

Political earthquake in Dhamangaon, Upsarpanch, three village panchayat members and six society directors including 50 workers join BJP, karjat jamkhed vidhan sabha election live update,

ना पैसे, ना दबाव, ना बळजबरी, ना कसले आमिष अश्या कोणत्याही गोष्टींना बळी न पडता धामणगावमधील ५० प्रभावशाली जनाधार असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी व अभिमानासाठी सुरु असलेल्या ‘भूमिपुत्रांच्या’ लढ्याला ‘बळ’ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या सर्वांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.हा पक्ष प्रवेश सोहळा जामखेड बाजार समितीचे संचालक तथा भाजपा युवा नेते सचिन घुमरे यांनी घडवून आणला. आमदार प्रा राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी रविवारी मध्यरात्री हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

धामणगावचे उपसरपंच, तीन ग्रामपंचायत सदस्य व सहा सोसायटी संचालक यांच्यासह ५० प्रभावशाली युवकांनी रोहित पवारांची साथ सोडली आहे. धामणगावमध्ये झालेल्या या राजकीय भूकंपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांना जनतेसह ग्रामपंचायत व सोसायटी पदाधिकारी यांचा पाठिंबा वाढू लागला असल्याचेच दिसून येत आहे.

धामणगावमधील खालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

जामखेड बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे यांच्या पुढाकारातून धामणगावचे उपसरपंच, गणेश थोरात, सोसायटीचे व्हा. चेअरमन पप्पाजी थोरात, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब महारनवर, नितीन घुमरे, प्रभाकर महारनवर, सोसायटीचे माजी चेअरमन बापूराव घुमरे, सोसायटीचे संचालक सागर गोरे, नानासाहेब महानवर, कानिफनाथ घुमरे, अमोल शिरसागर, निलेश महारनवर मेजर दत्ता निकम, रवींद्र घुमरे, संजय महारनवर, विनेश वाघमोडे, बिरुदेव महानवर, गंगाराम महानवर, विष्णू सुरवसे, मुकुंद नंदिरे, बाबु राऊत, अशोक घुमरे, भाऊसाहेब घुमरे, महादेव घुमरे, सागर गायकवाड, शिवनाथ वाघमोडे, संतराम घुमरे, बंडू महानवर, नवनाथ महारनवर, प्रवीण महानवर, माऊली महानवर, चंद्रकांत घुमरे, अशोक शिवाजी घुमरे, गोरख क्षीरसागर, नामदेव घुमरे, दादा महानोर, विशाल महानवर, महेश घुमरे, उमेश घुमरे भीमराव महारनवर, सुभाष महारनवर, डॉक्टर अमोल घुमरे, लक्ष्मण महानवर, शंकर घुमरे, पिंटू क्षीरसागर, विष्णू सुरवसे सह आदी कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.