Karjat Jamkhed News : डोणगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राजकीय भूकंप, आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील डोणगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीच्या जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. या राजकीय भूकंपामुळे रोहित पवारांना जोरदार धक्का बसला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातील जेष्ठ व युवा कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने आमदार राम शिंदेंच्या पाठीशी एकवटू लागले आहेत. मतदारसंघातील स्वाभिमानी भूमिपुत्रांनी रोहित पवारांविरोधात एल्गार पुकारल्याचेच यानिमित्ताने दिसू लागले आहे.
मंगळवारी मध्यरात्री जामखेड तालुक्यातील दोन गावांमध्ये मोठे राजकीय भूकंप झाले. पहिला भूकंप डोणगाव येथे झाला. डोणगावमधील ५० युवकांनी रोहित पवारांची साथ सोडली. त्यानंतर दुसरा भूकंप देवदैठणमध्ये झाला. देवदैठणमधील सोसायटी चेअरमन, दोन संचालक, दोन ग्रामपंचायत सदस्यांसह १०० प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी रोहित पवारांची साथ सोडली. रोहित पवारांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराविरोधात बंड पुकारत या युवकांनी भाजपात प्रवेश केला. ऐन दिवाळीत झालेल्या या राजकीय धमाक्याने रोहित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे. या राजकीय भूकंपामुळे जामखेडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
बुधवारी मध्यरात्री डोणगाव येथील जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेतली. कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी व अभिमानासाठी सुरु असलेल्या ‘भूमिपुत्रांच्या’ लढ्याला ‘बळ’ देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ‘आपला तो आपलाच’ असतो म्हणत माजी सरपंच गौतम गायकवाड, माजी सरपंच कैलास पवार, जेष्ठ नेते कांतीलाल धनवे, रामदास सातव,पोपट मोरे, संभाजी सातव, युवा नेते लक्ष्मण मुळे, विष्णू सातव, बाळू सातव, जनार्धन सातव, दादा यादव, केशव रोडे, हनुमंत सातव, अनिकेत मुळे, युवा कार्यकर्ते राजू जगताप, सुदाम धनवे, या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
रोहित पवारांच्या हुकूमशाही कारभाराला कंटाळून अनेक प्रभावशाली कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडण्याचा धडाकाच लावला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांविरोधात मोठी लाट निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे.