जवळ्यात राजकीय भूकंप : सोसायटी संचालकांसह प्रभावशाली जनाधार असलेल्या बड्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्याच्या राजकारणातील सर्वात महत्वपूर्ण गाव असलेल्या जवळा गावात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.जवळा सेवा सोसायटीचे संचालक कैलास पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण लेकुरवाळे, बालाजी पाटील, दिलीप वाळुंजकर या प्रभावशाली व जनाधार असलेल्या महत्वाच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रमुख कार्यकर्त्यांनी भूमिपुत्र आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश. या राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादी अर्थात रोहित पवार गटाला मोठे भगदाड पडले आहे.

रोहित पवारांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराविरोधात मतदारसंघातील गावागावात मोठ्या प्रमाणात बंड होऊ लागले आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या शाश्वत विकासावर प्रेरित होऊन तसेच कर्जत-जामखेडच्या स्वाभिमान आणि अभिमानासाठी भूमिपुत्रांनी हाती घेतलेल्या निर्णायक लढ्यास बळ देण्यासाठी जवळा गावातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे आमदार प्रा राम शिंदे यांची राजकीय ताकद वाढली आहे

कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा धनशक्ती (पार्सल) विरूध्द जनशक्ती (भूमिपुत्र) अशी थेट लढत आहे. यामुळे सर्वसामान्य गोरगरिब जनतेची मोठी ताकद आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी एकवटली आहे. आमदार शिंदे यांच्या जनसंवाद पदयात्रेने मतदारसंघाचे चित्रच बदलून गेले आहे. आमदार राम शिंदे यांनी मतदारसंघात केलेल्या शाश्वत विकासावर प्रेरित होऊन मतदारसंघातील शेकडो युवक व जेष्ठ कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भाजपात प्रवेश करण्याचा जोरदार धडाका लावला आहे. ‘दबाव, दडपशाही, गुंडशाही, हिटलरशाही, हुकुमशाही, विविध प्रलोभने या सर्वांना झुगारून गावागावात रोहित पवारांविरोधात बंड सुरू झाले आहे. पाच वर्षे केलेली जाहिरातबाजी, इव्हेंटबाजी आणि गंडवागंडवीच्या विरोधात जनतेचा उद्रेक उफाळून आला आहे.’

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांच्या विजयासाठी ज्यांनी ज्यांनी जीवाचं रान केलं होतं, त्या सर्वांनी रोहित पवारांविरोधात एल्गार पुकारत आमदार प्रा. राम शिंदे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. रोहित पवारांची साथ सोडत या सर्वांनी भाजपात प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे. मंगळवारी मध्यरात्री जवळा सेवा सोसायटीचे संचालक कैलास पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण लेकुरवाळे, बालाजी पाटील, दिलीप वाळुंजकर या प्रभावशाली व जनाधार असलेल्या महत्वाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.हा पक्षप्रवेश सोहळा चोंडी येथे पार पडला. यावेळी युवा नेते प्रशांत शिंदे, माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, सरपंच सुशील आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत (बाप्पू) पाटील, नितीन कोल्हे, डाॅ दिपक वाळुंजकर, सोसायटी संचालक मच्छिंद्र सुळ, राहूल पाटील, अनिल हजारे, संदिप माने, लखन हजारे, उमेश हजारे, सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांविरोधात मोठी लाट सक्रिय झाली आहे. गावागावातील राष्ट्रवादीचे अनेक नेते व कार्यकर्ते आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करू लागले आहेत. या सर्व घडामोडी पाहता स्थानिक भूमिपुत्र आमदार राम शिंदे यांची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याचे दिसत आहे. यंदा मतदारसंघामध्ये स्थानिक कार्यकर्ते व गोरगरीब सर्वसामान्य जनता आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात एकवटली आहे. यंदाच्या निवडणुकीत आमदार राम शिंदेंचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे. भाजपा विजयाचा गुलाल उधळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.