Prashant Shinde will soon join the NCP | अखेर मुहर्त ठरला ! प्रशांत शिंदे जाणार ‘या’ पक्षात !

03 सप्टेंबर रोजी होणार पक्षप्रवेश !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा युवा नेते प्रशांत शिंदे यांची भाजपने १२ जुलै रोजी पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्याची घोषणा केली होती. भाजपच्या या निर्णयानंतर जामखेडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. भाजपच्या या निर्णयानंतर प्रशांत शिंदे समर्थकांनी मोठी मोहिम उघडली होती. दरम्यान प्रशांत शिंदे आता कोणत्या पक्षात जाणार यावरच बरीच चर्चा झडत होती अखेर प्रशांत शिंदे हे पुढील महिन्यात बड्या राजकीय पक्षात प्रवेश करणार आहेत. (Prashant Shinde will soon join the NCP)

दरम्यान प्रशांत शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वर्तुळात नाराज होते. सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचा वावर कमी झाला होता. शिंदे यांची नाराजी दुर करण्यासाठी पक्षाकडून कोणतेच प्रयत्न करण्यात आले नाहीत.  मात्र जवळा गावच्या विकास कामासंदर्भात आमदार रोहित पवार यांची शिंदे यांनी पुण्यात भेट घेतल्याचे सोशल मिडीयावर समोर येताच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. (Prashant Shinde will soon join the NCP)

जवळा हे तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचे गाव आहे. या गावाने आजवर भाजपला सातत्याने मोठी साथ दिली आहे. प्रशांत शिंदे यांच्या भावजय येथील सरपंच आहेत. एकुणच गावचा कारभार प्रशांत शिंदे या तरूण युवा नेत्याच्या भोवती केंद्रित आहे. दरम्यान भाजपातून शिंदे यांची हकालपट्टी झाल्यानंतर ते कुठल्या पक्षात जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. (Prashant Shinde will soon join the NCP)

शिंदे हे राष्ट्रवादीत येणार आहेत ही बााब प्रथमदर्शनी स्पष्ट होती. त्यानुसार मोर्चेबांधणी सुरू होताच जुन्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आढेवेढे घेत पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवला. काहींनी छुप्या पध्दतीने मोहिम राबवली. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या तरी निर्णय होत नव्हता. दरम्यान शिंदे समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता होती. (Prashant Shinde will soon join the NCP)

सोमवारी जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची आमदार रोहित पवार यांच्या सोबत बैठक पार पडली. या बैठकीत प्रशांत शिंदे यांच्या प्रक्षप्रवेशावर सविस्तर चर्चा होऊन शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहर्त ठरवण्यात आला. (Prashant Shinde will soon join the NCP)

अखेर प्रशांत शिंदे यांच्या पक्षश्रेष्ठी निर्णय सोमवारी पुण्यात झाला. प्रशांत शिंदे हे दि ०३ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती सोमवारी सायंकाळी समोर आली आहे. प्रशांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे जवळ्यात राष्ट्रवादीला मोठी ताकद मिळणार आहे. तसेच तालुक्यातही प्रशांत शिंदे यांचा मोठा मित्रपरिवार आहे. तोही आता राष्ट्रवादीच्या तंबूत डेरेदाखल होईल हे मात्र निश्चित! (Prashant Shinde will soon join the NCP)