जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा यंदाही कायम राखली. यंदा या विद्यालयाच्या दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा या विद्यालयाने जपली आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने जामखेड तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक चालवले जाते. राज्याचे माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा कारभार चालतो. गेल्या पाच वर्षांपासून चोंडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आहे.
यंदा जाहिर झालेल्या निकालात विद्यालयाची विद्यार्थिनी अमृता दिपक ढवळे हिने 77 टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक संपादित केला. तर आदित्य राजेंद्र उबाळे याने 71 टक्के गुण पटकावत दुसरा क्रमांक पटकावला. तसेच धनश्री अनिल उदमले या विद्यार्थिनीने 70.60 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. दहावी परिक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, मुख्याध्यापक अंकुश मुळीक, सर्व शिक्षक आणि चोंडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.