जामखेड : आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते राजुरी सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ उगलमुगले यांचा सत्कार !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील राजुरी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी प्रसिध्द व्यापारी हरिभाऊ उगलमुगले यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते त्यांचा आज सत्कार करण्यात आला.

Rajuri Society Chairman Haribhau Ugalmugle felicitated by MLA Prof. Ram Shinde!

राजुरी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन पदासाठी अडीच अडीच वर्षांचा कालावधी ठरविण्यात आला होता. अडीच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर चेअरमन काकासाहेब कोल्हे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानुसार भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा प्रसिध्द व्यापारी हरिभाऊ उगलमुगले यांची राजुरी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली.

दरम्यान, आज सोमवारी, आमदार प्रा.राम शिंदे यांनी राजुरी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन हरिभाऊ उगलमुगले यांचा चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सेवा संस्थेच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना न्याय देताना कसलीही अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले उपक्रम राबवा, शासनाकडून काही मदत लागली तर मी पाठपुरावा करेन, अशी ग्वाही आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली.

जामखेड बाजार समितीतील प्रसिध्द व्यापारी हरिभाऊ उगलमुगले यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलकडून जामखेड बाजार समितीची निवडणूक लढवली होती. बाजार समितीच्या माध्यमांतून तालुक्यातील शेतकऱ्यांची सेवा करण्याची त्यांची संधी हुकली होती. परंतू राजुरी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदाच्या माध्यमांतून त्यांना शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ते निश्चितच संस्थेच्या सभासदांसाठी नवनवीन उपक्रम राबवतील, असा विश्वास आता व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, यावेळी पार पडलेल्या सत्काराप्रसंगी जामखेड बाजार समितीचे सभापती पै शरददादा कार्ले, व्यापारी भरत पाटील शिंदे, उपसरपंच नानासाहेब खाडे, डाॅ दादासाहेब खाडे, कुसडगावचे माजी सरपंच सखाराम भोरे, कुसडगावचे सरपंच सिताराम कांबळे सह आदी यावेळी उपस्थित होते.