राष्ट्रीय छात्र सेनेचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण : जामखेड NCCतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहिम !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राष्ट्रीय छात्र सेना यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने आज 25 रोजी जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा भुईकोट किल्ला आणि सिताराम गड परिसरात जामखेड एनसीसीकडून स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. तसेच जामखेड आणि खर्डा शहरात प्लॅस्टिक निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली. याला मोठा प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रीय छात्र सेनेच 1948 साली नोव्हेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी झाली. 27 नोव्हेंबर ला एनसीसीच्या अमृत महोत्सव वर्षाची सुरवात होत आहे. या निमित्ताने एनसीसीकडून वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार आज जामखेड शहरात स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा शुभारंभ नायब तहसीलदार मनोज भोसेकर, प्राचार्य डोंगरे एम एल, प्राचार्य मोडके बी के, प्राचार्य श्रीकांत होशिंग सैनिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग डोके ,रमेश अडसूळ, रघुनाथ मोहोळकर,आप्पासाहेब पारखे, रवींद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर एनसीसीच्या वतीने खर्डा शहरातून प्लास्टिक निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी सरपंच गोपालघरे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शशी म्हस्के, बाळू खाडे, प्राचार्य सोमनाथ उगले, दत्तराज पवार, अनिल धोत्रे, संतोष थोरात, क्रांतिवीर अकॅडमीचे संचालक मेजर रावसाहेब जाधव,सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड महाविद्यालय, ल ना होशिंग विद्यालय व नागेश विद्यालय जामखेडच्या 150 एनसीसी छात्रांनी ऐतिहासिक खर्डा किल्ला परिसराची स्वच्छता केली.अनावश्यक गवत केर कचरा ,अनावश्यक झाडे झुडपे, प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा स्वच्छ एकत्रित करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. तसेच सिताराम गडावरही स्वच्छता मोहिम राबवली करून योग्य विल्हेवाट लावली.
ही मोहिम सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अनगर चे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष यांच्या आदेशानुसार व एनसीसी ऑफिसर कॅप्टन गौतम केळकर, सेकंड ऑफिसर अनिल देडे, थर्ड ऑफिसर मयूर भोसले यांनी राबवली.