Republic Day 2025 : प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची इच्छा, सत्यनिष्ठा आणि नैतिकता या गोष्टी देशाला महान बनवतात – डाॅ अनिल काळे, हळगाव कृषि महाविद्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : देशाला प्रजासत्ताक करण्यासाठी स्वातंत्र सैनिकांनी अथक परिश्रम केले. त्यांचे बलिदान कधीही विसरू नका, प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांमध्ये आनंद, उल्हास आणि नवी चेतना भरतो. आपण भारत मातेची माती बना, त्यावर फुल उमलतील, त्याचा सुगंध चहूकडे पसरेल, तीची सेवा करा, असे अवाहन करत प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची इच्छा, सत्यनिष्ठा आणि नैतिकता या गोष्टी देशाला महान बनवतात, असे प्रतिपादन डॉ. अनिल काळे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलताना केले.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाॅ अनिल काळे बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना डाॅ अनिल काळे म्हणाले की, महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विविध पिकांचे सुधारित वाण, संशोधन शिफारसी आणि कृषि यंत्रे तयार करून प्रसारीत केली आहेत. त्याचा जास्तीत जास्त फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा. तसेच, हवामान आधारित पीक पद्धती, शेतीसाठी ड्रोन तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, AI या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असा सल्ला देत त्यांनी महाविद्यालयात प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांचा इतिवृतांत यावेळी सादर केला.

कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कृषिविद्या प्रयोगशाळा कार्यान्वित
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हळगाव कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कृषिविद्या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.या प्रयोगशाळेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अधिक फायदा होणार आहे. कार्यक्रमादरम्यान, महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, प्रतिष्ठित ग्रामस्थ इत्यादींनी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा, रोपवाटिका व गांडूळखत उपक्रमास भेटी दिल्या.

प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३५ पिशव्या रक्ताचे संकलन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. सदर शिबिरासाठी डॉ. रोहन जाधव, पथक प्रमुख, रक्तकेंद्र, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर व त्यांची टीम महाविद्यालय आली होती.

यांची होती उपस्थिती
सदर कार्यक्रमास विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनावणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. पोपट पवार, डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. गोकुळ वामन, डॉ. मनोज गुड, डॉ. निलेश लांडे, डॉ. महेश निकम, डॉ. अंबादास मेहेत्रे, डॉ. निकिता धाडगे, डॉ. उत्कर्षा गवारे, अर्चना महाजन, डॉ. किरण चौधरी, डॉ. प्रणाली ठाकरे, शिक्षकेतर कर्मचारी संजय आढाव, अमृता सोनावणे, संभाजी ठवाळ, महेश सुरवसे, प्रदिप धारेकर, किरण अडसुर सह माजी जि.प.सदस्य सोमनाथ पाचारणे, निवृत्त कृषि अधिकारी सुभाष ढवळे, आबासाहेब ढवळे, युवा नेते विशाल भांडवलकर, शरद ढवळे, दगडू पुराणे, विद्यार्थी व सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण अधिकारी, प्रा. पोपट पवार, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, डॉ. निलेश लांडे, प्रभारी सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण यांनी विशेष मेहनत घेतली.
