जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्यात सोसायटी निवडणुकांचा धडाका सुरू आहे. अतिशय चुरशीच्या आणि अतितटीच्या वातावरणात या निवडणुका पार पडत आहेत, जामखेड तालुक्यातील बावी सोसायटीचा निकालही नुकताच लागला आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडीने बावी सोसायटीवर कब्जा मिळवला आहे.
जामखेड तालुक्यातील बावी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. बावी सोसायटीसाठी एकुण 534 मतदारांपैकी 507 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शेतकरी विकास आघाडी विरूध्द बळीराजा पॅनल अशी थेट लढत झाली. अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीने 9 जागा जिंकत बळीराजा पॅनलचा धुव्वा उडवला. विरोधी पॅनलला अवघ्या 4 जागांवर निसटता विजय मिळाला.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी कृषी अधिकारी सुंदरलाल बिरंगळ, सरपंच निलेश पवार, उपसरपंच दादासाहेब मंडलिक, राम पवार राहूल कवादे, लियाकत शेख, लालासाहेब पवार,शहाजी कवादे, मगनदास बिरंगळ, मच्छिंद्र पवार, भाऊसाहेब पवार यांनी शेतकरी विकास आघाडी स्थापन केली होती. या आघाडीने 9 जागांवर दिमाखदार विजय मिळवत सोसायटीवर कब्जा मिळवला.
शेतकरी विकास आघाडीचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे
1. सुंदरदास पांडूरंग बिरंगळ – 255
2. दादासाहेब रावसाहेब पवार – 252
3. सलमान दस्तगीर पठाण – 237
4. संतोष चंद्रहार पवार – 233
5. दादासाहेब वामन पवार – 270
6. महादेव किसन शिंदे – 263
7. विठ्ठल गोविंद कारंडे – 25
8.विजूबाई सदाशिव पवार – 244
9. जयश्री जगन्नाथ पवार – 243
बळीराजा पॅनलचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे
1. भागवत विनायक कारंडे – 232
2. सुभाष यशवंत कारंडे – 234
3. केशव साहेबराव मुरूमकर- 238
4. भिमराव श्रीपती निकम – 247
शेतकरी विकास आघाडीत गोविंद कारंडे, बदाम शेख, अनिल भिसे,भाऊसाहेब पवार, अशोक शिंदे, राम पवार, गणेश पवार, दत्तात्रय पवार, बाबासाहेब पवार, सुनिल पवार, शहाजी कवादे, मुकुंद पवार, बाबू पवार, मच्छिंद्र पवार, मगनदास बिरंगळ, हनुमंत कवादे, राहूल कवादे, हरिश्चंद्र कवादे, बाळनाथ बिरंगळ, शहाजी बिरंगळ, रविंद्र बिरंगळ, बजरंग बिरंगळ, रामकृष्ण पवार, पप्पू कवादे, ॲड कालिदास पवार, हरी पवार, राजेंद्र पवार, अनिल पवार, धनु पवार, भिरू कारंडे (मेजर), अंगद कारंडे, किरण शिरोळकर, नितीन जगताप, अशोक पवार, बाप्पूभाई सय्यद, रामकृष्ण पवार, इमाम पठाण, रज्जाकभाई, दस्तगीरभाई, युनूसभाई सह आदी नेत्यांचा समावेश होता.