साहेब तुम्हाला चुलता, पुतण्या, भाऊ, कोणीही नसुद्या, आम्ही तुमच्या भावासारख काम करू – युवा नेते प्रशांत शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। 4 जानेवारी 2024 : “परवा एका कार्यक्रमात बोलताना आमदार राम शिंदे साहेब म्हणाले की, माझा कोणी भाऊ नाही, माझं कोण चुलता नाही, पुतण्या नाही, पण साहेब या ठिकाणी मी तुम्हाला नक्की सांगतो की, आम्ही तालुक्यातील जे नवीन कार्यकर्ते आहोत ते तुमच्या भावासारखचं काम करू आणि 2024 ला तुम्हाला जनतेतून आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, असा विश्वास देत भाजपचे युवा नेते प्रशांत शिंदे यांनी गावागावातील तरूण कार्यकर्ते तुमच्या विजयासाठी जीवाचं रान करण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट केले.”
आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते प्रशांत शिंदे मित्र मंडळाच्या वतीने अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या किर्तनाचे जामखेड तालुक्यातील जवळा येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळा गावचे उपसरपंच प्रशांत शिंदे बोलत होते.तत्पुर्वी प्रचंड जनसुदायाच्या उपस्थितीत आमदार प्रा.राम शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेषता: महिलांची उपस्थिती प्रचंड होती.
यावेळी पुढे बोलताना प्रशांत शिंदे म्हणाले की, आमदार प्रा.राम शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात जवळा गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. जवळेश्वर मंदिर परिसराचा विकास त्यांनीच केला. त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे जवळा गावात बागायत क्षेत्रात वाढ झाली.याचे सर्व श्रेय जलयुक्त शिवार योजनेला आहे,असे सांगत संत सावता महाराज मंदिर व परिसराच्या विकासासाठी तसेच सभामंडपासाठी निधी द्यावा. त्याचबरोबर जवळेश्वर मंदिर परिसरात अजून एका सभामंडपाची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना प्रशांत शिंदे म्हणाले, मोठ्या राजकीय घराण्यातील कुटूंबची कुटूंब प्रचाराला असतं, तसं राम शिंदे साहेबांचं बघितलं तर त्यांच्या कुटुंबामध्ये स्वता: साहेबच त्यांच्या प्रचाराला किंवा लोकांच्या भेटी गाठीसाठी असतात. परवा एका कार्यक्रमात बोलताना ते भावूक झाले होते. त्यावेळी बोलताना आमदार राम शिंदे साहेब म्हणाले की, माझा कोणी भाऊ नाही, माझं कोण चुलता नाही, पुतण्या नाही, पण साहेब या ठिकाणी मी तुम्हाला नक्की सांगतो की, आम्ही तालुक्यातील जे नवीन कार्यकर्ते आहोत ते तुमच्या भावासारखचं आम्ही काम करू आणि 2024 ला तुम्हाला जनतेतून आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, गावागावातील तरूण कार्यकर्ते तुमच्या विजयासाठी जीवाचं रान करण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
साहेब मतदारसंघाला तुमची गरज आहे. तुम्ही आमदार झाले नाही तरी तुम्हाला अडचण येणार नाही, पण मतदारसंघातील मायबाप जनतेला मागच्या दोन अडीच वर्षांत खूप अडचणींचा सामना करावा लागलाय. त्याचा आम्हीही प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. त्यामुळे आम्हाला व मतदारसंघालाही तुमची गरज आहे. सध्या वारं फिरलेलं आहे त्यामुळे आता आमदार प्रा राम शिंदे साहेबांना कोणीच रोखू शकणार नाही, असा विश्वास यावेळी प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, नगरसेवक अमित चिंतामणी, ॲड प्रविण सानप, भाजपचे तालुका उपाध्यक्ष बापुराव ढवळे, उपसरपंच प्रशांत शिंदे , भाजपा वैद्यकिय आघाडीचे तालुकाध्यक्ष डाॅ.दिपक वाळुंजकर, सरपंच सुशील आव्हाड, सदस्य राहूल पाटील, काकासाहेब वाळुंजकर, सुभाष रोडे, नितीन कोल्हे , हरिदास हजारे, सावता हजारे, पांडुरंग शिंदे, भाऊ महारनवर, अनिल हजारे , महेंद्र खेत्रे, पांडुरंग रोडे, मुंजेवाडीचे सरपंच बाबासाहेब महारनवर, राजाराम सूळ, दत्तात्रय हजारे डाॅ. ईश्वर हजारे, वैभव हजारे यांच्यासह मोठया संख्येने लोक उपस्थित होते.